अकरावीसाठी ८८ हजार जागा

By admin | Published: August 6, 2016 01:22 AM2016-08-06T01:22:02+5:302016-08-06T01:23:01+5:30

अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली

88 thousand seats for the eleventh | अकरावीसाठी ८८ हजार जागा

अकरावीसाठी ८८ हजार जागा

Next


मुंबई : अकरावीला आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमधून दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबवण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या किमान ८८ हजार जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
शुक्रवारपासून नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना केले होते. त्यानंतर ८ व ९ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरायचे आहेत. शिवाय अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालये निवडणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. याआधीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेप्रमाणे विशेष फेरीत महाविद्यालय निवड करताना क्षेत्र किंवा वॉर्डचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या आवडत्या महाविद्यालयांची नावे देण्याची संधी मिळणार आहे.
सहाव्या गुणवत्ता यादीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकूण ९७ हजार ६०९ जागा रिक्त होत्या. त्यात कला शाखेच्या १८,५३६ वाणिज्यच्या ५३,५१५ आणि विज्ञान शाखेच्या २५,५५८ रिक्त जागांचा समावेश होता. मात्र सहाव्या गुणवत्ता यादीत एकूण ९, ६४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. मात्र त्यांतील ९,६४५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान ८७,९६४ जागा रिक्त राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवाय १०० टक्के विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने रिक्त जागांचा आकडा ९० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
>विशेष फेरीसाठी अर्ज करणाऱ्यांनो हे लक्षात ठेवाच
दूरचे महाविद्यालय मिळालेले, शाखाबदल करायचा आहे, विषयबदल करायचा आहे, असे सर्व विद्यार्थी या विशेष फेरीसाठी अर्ज करू शकतात.
विशेष फेरीसाठी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे.
शुक्रवारी, ५ आॅगस्टपासून नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड
तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
नवीन लॉगइन आयडी व पासवर्ड तयार केल्यानंतर प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.
विशेष फेरीसाठी किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांची निवड करणे बंधनकारक आहे.
महाविद्यालयांची निवड करताना संबंधित महाविद्यालयातील रिक्त जागा आणि कट आॅफ पाहूनच निवड करावी.
कोणत्याही क्षेत्र किंवा वॉर्डमधील महाविद्यालय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे.
याआधी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतून घेतलेला प्रवेश विशेष फेरीसाठी अर्ज करताना रद्द करण्याची गरज नाही.
>उपलब्ध जागांची संख्या
शाखारिक्त जागा
कला१८ हजार ५३६
वाणिज्य५३ हजार ५१५
विज्ञान२५ हजार ५५८
एकूण९७ हजार ६०९

 

अर्धवट अर्ज भरल्याने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या यादीसाठी एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार आहे.
मात्र या विद्यार्थ्यांना शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि महानगर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शुक्रवारी महाविद्यालयापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. 

 

Web Title: 88 thousand seats for the eleventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.