100 दिवसांत 8.82 लाख घरे बांधणार; ग्रामीणमध्ये महाआवास अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 06:52 AM2020-11-21T06:52:23+5:302020-11-21T06:52:43+5:30

सध्या अपूर्ण असलेली घरे पूर्ण करणे आणि नवीन घरे बांधणे या दोन्हींचा अभियानात समावेश असेल.

8.82 lakh houses to be built in 100 days; Mahaavas Abhiyan in rural areas | 100 दिवसांत 8.82 लाख घरे बांधणार; ग्रामीणमध्ये महाआवास अभियान

100 दिवसांत 8.82 लाख घरे बांधणार; ग्रामीणमध्ये महाआवास अभियान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात आजपासून महाआवास अभियान ग्रामीण भागात सुरू करण्यात आले असून त्या अंतर्गत २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत म्हणजे केवळ १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधण्यात येतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले.


सध्या अपूर्ण असलेली घरे पूर्ण करणे आणि नवीन घरे बांधणे या दोन्हींचा अभियानात समावेश असेल.  केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरिल निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना यांमधून ग्रामीण नागरीकांना घरे देण्यात येत आहेत. 
शासनामार्फत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत सर्वसाधारण क्षेत्राकरिता १ लाख २० हजार रुपये व डोंगराळ, नक्षलग्रस्त क्षेत्राकरिता १ लाख ३० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. या व्यतिरिक्त मनरेगाअंतर्गत ९० दिवसांची अकुशल मंजूरी १८ हजार रुपये तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रुपये अनुदान असे एकूण अनुक्रमे १.५० लाख व १.६० लाख रुपये अर्थसहाय्य घरकुल बांधकामासाठी देण्यात येते. यातून किमान २६९ चौरस फूट आकाराचे घर बांधले जाते. तसेच स्वत:ची जागा नसलेल्यांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. लाभार्थ्यांना दर्जेदार घर बांधता यावे म्हणून नियमित अनुदानाव्यतिरिक्त बँकेमार्फत ७० हजारांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कर्तव्यावर मृतांच्या वारसांना मदत
कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागातील १७ अधिकारी, कर्मचाºयांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासाठीचा आदेश काढण्यात आला असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

Web Title: 8.82 lakh houses to be built in 100 days; Mahaavas Abhiyan in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर