विदर्भ-मराठवाड्यातील रस्ते व पुलांसाठी ८९० कोटी

By admin | Published: February 6, 2015 12:55 AM2015-02-06T00:55:52+5:302015-02-06T00:55:52+5:30

विदर्भ-मराठवाड्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही विभागातील रस्ते व पुलांसाठी तब्बल ८९० कोटी रुपयांच्या

890 crores for roads and bridges in Vidarbha-Marathwada | विदर्भ-मराठवाड्यातील रस्ते व पुलांसाठी ८९० कोटी

विदर्भ-मराठवाड्यातील रस्ते व पुलांसाठी ८९० कोटी

Next

केंद्र शासनाकडून प्रस्ताव मंजूर : विकासाला चालना
नागपूर : विदर्भ-मराठवाड्यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची कृपा होण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही विभागातील रस्ते व पुलांसाठी तब्बल ८९० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना त्यांनी मंजुरी दिली आहे. यात तीन रेल्वे उड्डाणपूल व १० उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामुळे या भागाच्या विकासाचा मार्ग आणखी सुकर होईल. केंद्रात प्रतिनिधित्व करताना गडकरी यांनी आपली कर्मभूमी असलेल्या विदर्भ-मराठवाड्याला झुकते माप दिले आहे.
उमरेड तालुक्यातील सोनेगाव बेला सिर्र्सी रस्त्याची पुनर्बांधणी केली जाईल. यासाठी ७ कोटी ४३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मनसर-रामटेक-तुमसर रस्त्याची चार भागात दुरुस्ती केली जाईल. यासाठी तब्बल ३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. उमरेड-बुटीबोरी रोडची दुरुस्ती (३ कोटी), उमरेड तालुक्यातील बेला ठाणा रोड दुरुस्ती (१४.५० कोटी), भिवापूर जवळी नांद रोडची दुरुस्ती (३१.७० कोटी), पाचगाव-कुही-आंभोरा रस्त्याची दुरुस्ती (६० कोटी), खापा पारशिवनी आमडी रस्त्याची दुरुस्ती (७ कोटी), सावरगाव नरखेड मोवाड पुसला रस्त्याचे रुंदीकरण (२० कोटी), कारंजा भारसिंगी मोवाड
विदर्भ-मराठवाड्यातीलभानगाव रस्ता रुंदीकरणासाठी (१९ कोटी), भिष्णूर खंडाळा सावरगाव पिपळा रस्त्याची दुरुस्ती (१० कोटी ३० लाख), नगरधन मानापूर रामटेक रस्त्याची दुरुस्ती (२.४९ कोटी), पारशिवनी खापरखेडा रस्त्याची दुरुस्ती (१३.५२ कोटी), परळी-धर्मापुरी रस्त्याची दुरुस्ती (१५.७५ कोटी), अंबेजोगाई-शिरसाळा- सोनपत रस्त्याची दुरुस्ती (२५.९० कोटी), बीड-परळी-गंगाखेड रस्त्याची दुरुस्ती (१६ कोटी), सावरगाव- अंबेजोगाई-अहमदनगर रस्त्यासाठी (१८ कोटी), मुंबई-कल्याण, नगर-बीड रस्त्याची दुरुस्ती (३४ कोटी), बीड जिल्ह्यातील घोगसपारगाव-भगवानघर रस्त्याची दुरुस्ती (७ कोटी), काडा-केरुल-किन्ही-बीड- सांगवी-चिखली रस्त्याची दुरुस्ती (१५ कोटी), यवतमाळ जिल्ह्यातील वणी-मुकुटबन-बोरी रस्त्याची दुरुस्ती (२० कोटी), चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-चंदनखेडा रोड (५ कोटी), राजुरा-आदिलाबाद रस्त्याची दुरुस्ती (१० कोटी), राजुरा-चक्कडकोट- वाकडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 890 crores for roads and bridges in Vidarbha-Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.