सात महिन्यांत ८,९०० मृत्यू, राज्यात रस्ते अपघातांत वाढ; मुंबईत घटले, पुण्यात वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:19 AM2023-08-29T05:19:32+5:302023-08-29T05:19:40+5:30

गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातात १४६  ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने  घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे.

8,900 deaths in seven months, rise in road accidents in state; Decreased in Mumbai, increased in Pune | सात महिन्यांत ८,९०० मृत्यू, राज्यात रस्ते अपघातांत वाढ; मुंबईत घटले, पुण्यात वाढले

सात महिन्यांत ८,९०० मृत्यू, राज्यात रस्ते अपघातांत वाढ; मुंबईत घटले, पुण्यात वाढले

googlenewsNext

मुंबई : राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.  वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. जानेवारी ते जुलै  २०२३ या  कालावधीत  १९,७१९  अपघात झाले असून या अपघात ८,९०७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अपघात घटले असून पुण्यात वाढले आहेत.
गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातात १४६  ने तर मृत्यूंमध्ये ३८५ ने  घट झाली आहे, सध्याच्या घडीला राज्यात तीन कोटी ४७ लाख ७३ हजार ६२५ वाहनांची नोंदणी झालेली आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून हे अपघात कमी करण्यासाठी आरटीओसह वाहतूक पोलिस विविध योजना राबवीत आहेत. रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक करणे, वेगाने वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसविणे, गाडी चालवताना मोबाइलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही कारणे आहेत. अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. 

मुंबईत ५५१ अपघात 
मुंबईत एकूण ४३ लाखांहून अधिक वाहने आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये ५५१ अपघात झाले असून या अपघातात १४८ जणांचा मृत्यू झाला. २०२२ च्या तुलनेत अपघातात ५९० नी घट, मृत्यूंमध्ये 
६४ तर गंभीर जखमींची संख्या ४९२ ने कमी आहे.

पुण्यात ७०५ अपघात
पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ४९४ अपघातात १८९ लोकांचा मृत्यू झाला तर ३५२ जण जखमी झाले होते. यंदा सात महिन्यात ७०५ अपघातांत २०५ मृत्यू तर ५०२ जण जखमी झाले.

राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विविध पातळीवर काम केले जात आहे. त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. अपघातानंतर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासोबत अपघाताबाबत जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
-डॉ. रवींद्र सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक)

Web Title: 8,900 deaths in seven months, rise in road accidents in state; Decreased in Mumbai, increased in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात