बाबासाहेबांच्या जीवनावर ९०० फुटाचे पेन्सील रेखाटन

By admin | Published: October 13, 2016 09:03 PM2016-10-13T21:03:03+5:302016-10-13T21:03:03+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा समग्र आढावा घेणाऱ्या पेन्सीलद्वारे रेखाटन केलेल्या सात फूट उंच व ९०० फूट लांब कॅन्व्हासवर

9 00 foot pencil sketch on Babasaheb's life | बाबासाहेबांच्या जीवनावर ९०० फुटाचे पेन्सील रेखाटन

बाबासाहेबांच्या जीवनावर ९०० फुटाचे पेन्सील रेखाटन

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.13 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा समग्र आढावा घेणाऱ्या पेन्सीलद्वारे रेखाटन केलेल्या सात फूट उंच व ९०० फूट लांब कॅन्व्हासवर साकारलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांच्या हस्ते झाले.
दीक्षाभूमी परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात नाशिकच्या रेखाटन ट्रस्टतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र जीवन दर्शन या पेन्सीलद्वारे रेखाटलेल्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रप्रदर्शन प्रसिध्द चित्रकार अशोक नागपुरे व किशोर नागपुरे यांच्या कल्पनेतून साकारले आहे. या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर बालपण, शिक्षण, विदेशातील शिक्षण, पत्रकारिता, प्राध्यापक व वकिली व्यवसाय त्यानंतर सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील उभारलेल्या चळवळीचा समावेश आहे. काळाराम मंदिर प्रवेश, महाड येथील चवदार तळे, कोरेगाव प्रसंग, भारतीय राजघटनेचे सादरीकरण, बौध्द धर्माची दीक्षा, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले वास्तव्य, स्वत: वापरत असलेल्या वस्तू, वाहन, विविध भावमुद्रा, वंशावळ अशा विविध प्रसंगांचा समावेश आहे.
रेखाटन ट्रस्टतर्फे ९०० फूट लांबीच्या कॅनव्हासवर पेन्सीलचा वापर करून ११ महिन्यांत २७ निवडक विद्यार्थ्यांनी रेखाटन केले आहे. यासाठी कॅन्व्हास, पेन्सील, खोडरबर व कोटिंगस्प्रेचा वापर केला आहे. या प्रदर्शनाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक रेकॉर्ड येथे झाली असून इतर सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड निर्माण केले आहे.

Web Title: 9 00 foot pencil sketch on Babasaheb's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.