९०० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: May 25, 2016 02:14 AM2016-05-25T02:14:35+5:302016-05-25T02:14:35+5:30
राज्यातील जवळपास ९०० वर अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तालयातील
मुंबई : राज्यातील जवळपास ९०० वर अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी पोलीस मुख्यालयातून
जारी करण्यात आले. त्यामध्ये
मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तालयातील अडीचशेवर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे ६०० वर पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश बुधवारी जारी होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्वरित संबंधित ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी घटकप्रमुखांना दिले आहेत. त्याबाबतचा अहवाल पोलीस मुख्यालयाला सादर करावा लागणार आहे. बदली झालेल्यामध्ये ४३८ पोलीस निरीक्षक, ४०४ सहाय्यक निरीक्षक त्याचप्रमाणे मोटार परिवहन (एमटी), वायरलेस व तांत्रिक विभागातील ४५ वर उपनिरीक्षकांचा समावेश आहे. आयुक्तालय व जिल्हा अधीक्षक कार्यालयाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.