मुंबईतून वर्षभरात ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण
By admin | Published: January 12, 2016 09:52 AM2016-01-12T09:52:41+5:302016-01-12T10:12:48+5:30
मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या असून, मागच्या वर्षभरात मुंबईतून ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या असून, मागच्या वर्षभरात मुंबईतून ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारीच्या ताज्या आकडेवारीमधून वर्षभरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये एकाएकी वाढ झाल्याचे दिसून येते.
२०१४ मध्ये मुंबईतून ३०९ मुलींचे अपहरण झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना अल्पयवीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारींचा अपहरण म्हणून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे थेट बेपत्ता मुलांच्या तक्रारीची अपहरण म्हणून नोंद होत असल्याने गुन्ह्यात एकाएकी वाढ झाल्याचे मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते आणि उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
पोलिस अपहरणाच्या गुन्ह्याचा गांर्भीयाने तपास करतात तसेच बेपत्ता मुलांना शोधण्यासाठीही तितकीच मेहनत घेतात असे धनजंय कुलकर्णी यांनी सांगितले. १० वर्ष वयोगटाच्या आतील मुलींचे अपहरणाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे मात्र अल्पवयीन जोडीदारांचे घरातून पळून जाण्याची प्रकरणे अधिक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितेल.