सेट परीक्षेसाठी ९५ हजार अर्ज
By admin | Published: March 18, 2016 02:31 AM2016-03-18T02:31:19+5:302016-03-18T02:31:19+5:30
महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘सेट’ परीक्षेस सुमारे ९५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कमी कालावधीतही येत्या २९ मे रोजी
पुणे : महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘सेट’ परीक्षेस सुमारे ९५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कमी कालावधीतही येत्या २९ मे रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे,असे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारी ते १५ मार्च कालावधीत परीक्षेचा अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला
होता.
सप्टेबर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची वाट विद्यार्थी आतुरतेने पाहत होते कारण; त्यापूर्वी अनेक महिने ‘सेट’ परीक्षा
घेतली गेली नव्हती. आता सहा महिन्यानंतर सेट परिक्षेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून राज्यातील प्रमुख १५ शहरांमध्ये २९ मे रोजी परीक्षा घेतली जाईल. तरीही
या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही. १५ मार्चला सायंकाळी ६ वाजेपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
होता.
सेट विभागाकडे आॅनलाईन पध्दतीने अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अर्जाची व कागपत्रांची तपासणी विद्यापीठातर्फे केली
जात नाही. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडूनच कागदपत्रांची
पूर्तता करून घेतली जाईल.
त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उत्तीर्णतेचे प्रमाणत्र दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)