अंबरनाथ शिवमंदिराचा ९५५वा वर्धापन दिन

By admin | Published: August 24, 2015 12:51 AM2015-08-24T00:51:44+5:302015-08-24T00:51:44+5:30

देशात भूमीज शैलीत बांधलेल्या अत्यंत प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या अंबरनाथमधील शिवमंदिराचा ९५५ वा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात येणार आहे.

9 55th anniversary of Ambernath Shivmandir | अंबरनाथ शिवमंदिराचा ९५५वा वर्धापन दिन

अंबरनाथ शिवमंदिराचा ९५५वा वर्धापन दिन

Next

पंकज पाटील , अंबरनाथ
देशात भूमीज शैलीत बांधलेल्या अत्यंत प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या अंबरनाथमधील शिवमंदिराचा ९५५ वा वर्धापन दिन सोमवारी साजरा करण्यात येणार आहे. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही या मंदिराच्या वैभवाची साक्ष देत आहेत.
शिलाहार राजघराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात श्रावण शुद्ध ९ शके ९८२ म्हणजेच २७ जुलै १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाले आहे. त्यानुसार, त्याचा वर्धापन दिन श्रावण शुद्ध नवमीला साजरा करण्यात येतो. वर्धापन दिनानिमित्त एका समारंभाचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या वतीने जलाभिषेक करण्यात येणार आहे. मंदिर बांधण्यासाठी ३५ ते ४० वर्षे लागली. जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ज्या २१८ वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यात या मंदिराचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 9 55th anniversary of Ambernath Shivmandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.