राज्यातील ९६ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

By Admin | Published: April 30, 2017 01:33 AM2017-04-30T01:33:16+5:302017-04-30T01:33:16+5:30

राज्य पोलीस दलात ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या ९६ सहाय्यक पोलीस आयुुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा गृहविभागाकडून

9 6 Assistant Commissioner's Transfer in the State | राज्यातील ९६ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

राज्यातील ९६ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 -  राज्य पोलीस दलात ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या ९६ सहाय्यक पोलीस आयुुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरा गृहविभागाकडून हा बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला.
राजेंद्र माधवराव मोरे (उपविभागीय अधिकारी, दौंड, पुणे ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, गणेशपुरी उपविभाग, ठाणे ग्रामीण), वैशाली ईश्वर कडुकर (हवेली, पुणे ग्रामीण ते सीआयडी, पुणे), गणेश गावडे (बीड ते सहाय्यक आयुक्त, पुणे शहर), रशिद भुभान तडवी (पुणे शहर ते मुखयालय, जळगाव), विकास तोटावार (ठाणे शहर ते महामार्ग सुरक्षा पथक, पुणे), माणिक आसाराम बाखरे (औरंगाबाद शहर ते आर्थिक गुन्हे, पुणे ग्रामीण), सुहास संपतराव गरूड (मुंबई ते हवेली, पुणे ग्रामीण), फत्तेसिंह नानासाहेब पाटील (लोहमार्ग, पुणे ते बोईसर, पालघर), समीर नजीर शेख (जळगाव ते पुणे शहर), प्रभाकर ढमाले (अ.ज.प्र.त. समिती, पुणे ते पुणे शहर), रमेश नागनाथ चोपडे (सातारा ते सीआयडी, पुणे), जयश्री तानाजी गायकवाड (रत्नागिरी ते पुणे शहर), बाजीराव दादोबा मोहिते (औरंगाबाद ग्रामीण ते पुणे शहर), देविदास विश्वासराव पाटील (सीआयडी, पुणे ते पुणे शहर), मिलिंद कालिदासराव पाटील (अमरावती शहर ते पुणे शहर), माधव शिंदे (सांगली ते पुणे शहर), संजय शामराव निकम (मुंबई ते पुणे शहर), कुंडलिक व्यंकटराव निगडे (नाशिक ते सीआयडी, पुणे), गणपतराव माडगुळकर (पुणे शहर ते देहू रोड, पुणे ग्रामीण), नंदकिशोर भोसले पाटील (रा. गु. वि., पुणे ते पुणे शहर) आणि दीपक हुंबरे (राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे ते पुणे शहर) यांच्या बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

प्रशांत बुरडे यांची नवी मुंबईत बदली
दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठिकाणात शनिवारी फेरबदल करण्यात आले आहेत. कोकण परिक्षेत्रातील विशेष महानिरिक्षक प्रशांत बुरडे यांची नाशिकच्या पोलीस अकादमीत झालेली बदली रद्द करून त्यांना नवी मुंबईचे सहआयुक्त पद देण्यात आले आहे. तर त्या ठिकाणी बदली दर्शविलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांना पूर्वीच्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

Web Title: 9 6 Assistant Commissioner's Transfer in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.