भाषा विषयाच्या पेपरमध्ये ९७ गैरप्रकार
By Admin | Published: March 3, 2017 12:51 AM2017-03-03T00:51:44+5:302017-03-03T00:51:44+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारपासून घेतली जात आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारपासून घेतली जात आहे. गुरुवारी भाषा विषयाच्या पेपरमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी राज्यातील ९७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक ५५ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केले आहेत.
गुरुवारी मराठी भाषेसह इतर भाषा विषयाची परीक्षा घेण्यात आली. पुणे, मुंबई, कोल्हापूर, कोकण विभागात परीक्षेदरम्यान एकही गैरप्रकार झाल्याचे आढळून आले नाही. नागपूर व नाशिक विभागात प्रत्येकी १९, अमरावती विभागात ३ आणि लातूर विभागात गैरप्रकार करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)