शपथविधीवर ९८.३३ लाख खर्च!

By admin | Published: January 21, 2015 02:10 AM2015-01-21T02:10:44+5:302015-01-21T02:10:44+5:30

वानखेडे मैदानात झालेल्या शपथविधीवर भाजपा सरकारने तब्बल ९८.३३ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

9 8.33 lakhs spent on oath! | शपथविधीवर ९८.३३ लाख खर्च!

शपथविधीवर ९८.३३ लाख खर्च!

Next

मुंबई : वानखेडे मैदानात झालेल्या शपथविधीवर भाजपा सरकारने तब्बल ९८.३३ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारन्वये प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून ही बाब समोर आली आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र अद्याप त्यांच्या तिजोरीतील केलेल्या खर्चाचा तपशील देण्याचे सौजन्य दाखविलेले नाही.
महाराष्ट्र शासन आणि मुंबई भाजपाकडे शपथविधीवर झालेल्या खर्चाची माहिती गलगली यांनी मागितली होती. शासनाचे अवर सचिव स.ज. मोघे यांनी यावर शासनातर्फे शपथविधीवर ९८ लाख ३३ हजार ८३० रुपये खर्च झाल्याचे त्यांना कळविले. शिवाय यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि इलाका शहर व कार्यकारी अभियंता (विद्युत) या विभागाने अनुक्रमे ६७ लाख ६६० रुपये, ३० लाख ६० हजार ६७० एवढ्या रकमेची देयके मंजुरीसाठी सादर केली आहेत. अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभागाकडूनही प्रवेशद्वारावर सुरक्षेच्या तपासणीसाठी लावण्यात आलेल्या साहित्याच्या भाड्यापोटी ७२ हजार ५०० रुपये रकमेचे देयक मंजुरीसाठी प्राप्त झाले आहे. मात्र कोणतीही रक्कम प्रदान केलेली नाही. (प्रतिनिधी)

वानखेडेच का? शपथविधीसाठी वानखेडेच का? याबाबतच्या
माहितीवर गलगली यांना राज्यपालांच्या निर्देशाची प्रत देण्यात आली आणि शपथविधीबाबत कोणतीही शासकीय अट किंवा शर्ती नसल्याचे स्पष्ट केले. २८ आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यपालांनी वानखेडेवर शपथविधी घेण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना दिले होते.

Web Title: 9 8.33 lakhs spent on oath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.