चष्म्याचा नंबर कमी करण्याचे 9 आयुर्वेदिक उपाय...

By Admin | Published: February 12, 2017 04:52 PM2017-02-12T16:52:02+5:302017-02-12T16:52:02+5:30

या उपायातून तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. कारण हे आयुर्वेदिक उपाय आहेत...अशाच काही उपयांवर नजर टाकूयात...

9 Ayurvedic remedies for reducing specimen number ... | चष्म्याचा नंबर कमी करण्याचे 9 आयुर्वेदिक उपाय...

चष्म्याचा नंबर कमी करण्याचे 9 आयुर्वेदिक उपाय...

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - आजकाल टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवत असल्याने कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढलंय. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. खालील उपायांद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर नक्कीच कमी होऊ शकतो. शिवाय या उपायातून तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. कारण हे आयुर्वेदिक उपाय आहेत...अशाच काही उपयांवर नजर टाकूयात...

- जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या.
- दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.
- दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात.
- रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.
- रोज रात्री 6-7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा.
- 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशोपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.
- गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
- एक चमचा बडिशोप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या.
- रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात.
 

Web Title: 9 Ayurvedic remedies for reducing specimen number ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.