काळे द्राक्षे खाण्याचे 9 फायदे, जे कदाचीत तुम्हाला माहिती नसतील...

By Admin | Published: February 26, 2017 04:27 PM2017-02-26T16:27:54+5:302017-02-26T16:34:20+5:30

डायबिटीस, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर काळ्या द्राक्षांचं नियमित सेवन नियंत्रण ठेवू शकतं. चला तर मग आज जाणुन घेऊया काळ्या द्राक्षाचे नेमके काय फायदे आहेत ते.

9 Benefits of eating black grapes, which you probably do not know ... | काळे द्राक्षे खाण्याचे 9 फायदे, जे कदाचीत तुम्हाला माहिती नसतील...

काळे द्राक्षे खाण्याचे 9 फायदे, जे कदाचीत तुम्हाला माहिती नसतील...

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 : द्राक्ष आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात, कारण हे पोषकतत्त्वांनी युक्त असतात. हे शारीरिक बळ वाढवणारे असतात. द्राक्षांचे वानस्पतिक नाव विटिस विनीफेरा आहे. द्राक्षांचे औषधी गुण पाहून म्हटले जाऊ शकते की, हे फळ रोग्यांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.द्राक्षांमध्ये क्लोराइड, पोटॅशियम क्लोरायइड, पोटॅशियम सल्फेट आणि एल्युमिन व इतर काही महत्त्वाचे पोषकतत्त्व उपलब्ध असतात. डायबिटीस, ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर काळ्या द्राक्षांचं नियमित सेवन नियंत्रण ठेवू शकतं. चला तर मग आज जाणुन घेऊया काळ्या द्राक्षाचे नेमके काय फायदे आहेत ते.

- काळी द्राक्षे नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

- काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

- काळी द्राक्षे शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

- काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.

- काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.

- नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं. 
- दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

- काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.

- काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.

Web Title: 9 Benefits of eating black grapes, which you probably do not know ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.