जालन्यात ४९ शेतक-यांसह ९ व्यापा-यांविरुद्ध गुन्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:41 AM2017-09-01T04:41:02+5:302017-09-01T04:41:26+5:30
नाफेडच्या केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.
राजेश भिसे
जालना : नाफेडच्या केंद्रावर बोगस नावाने तूर विक्री करणाºया ४९ शेतकºयांसह ९ व्यापाºयांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. दुसरीकडे परतूर, अंबड आणि तीर्थपुरी येथील केंद्रांवरील तूर विक्रीचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर होणार आहे.
जिल्ह्यात नाफेडने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासह परतूर, तीर्थपुरी, अंबड येथे तूर हमीभाव केंद्र सुरू केले होते. तसेच जालना नाफेड केंद्रावर परजिल्ह्यातील तुरीची विक्री झाल्याने निष्पन्न झाले. या केंद्रांवर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाल्याने काही व्यापाºयांनी शेतकºयांच्या नावावर तूर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी चार समित्या गठित करण्यात आल्या होत्या.
तपास अहवाल शुक्रवारी माझ्याकडे येणार आहे. अहवालाचा अभ्यास केल्यानंतर कारवाईची पुढील दिशा स्पष्ट होईल. मात्र कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
- बबनराव लोणीकर, पालकमंत्री.
हमीभाव केंद्रावरील तूर विक्रीचा चौकशी अहवाल मिळाला आहे. त्यानुसार संबंधितांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
- शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी.