वीज पडून ९ ठार, १३ जखमी

By admin | Published: September 15, 2014 12:58 AM2014-09-15T00:58:50+5:302014-09-15T00:58:50+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावतीत दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन बळी चंद्रपूर/गडचिरोली/अमरावती : रविवारी वीज पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावती

9 killed, 13 injured in electricity | वीज पडून ९ ठार, १३ जखमी

वीज पडून ९ ठार, १३ जखमी

Next

एका बैलाचाही मृत्यू : चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावतीत दोन व गडचिरोली जिल्ह्यात दोन बळी
चंद्रपूर/गडचिरोली/अमरावती : रविवारी वीज पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पाच, अमरावती जिल्ह्यात दोन आणि गडचिरोली जिल्ह्यात दोन असे सहा नागरिक जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात धाबापासून काही अंतरावर असलेल्या वामनपल्ली शेतशिवारात लैलाबाई रावजी गेडाम (४०), गौतम मानकर (३२), गीताबाई चंद्रकांत येवले (४५) रा. विसापूर व चिमूर तालुक्यातील मसली गावाजवळील शेतशिवारात इंद्रजित नन्नावरे (३५) आणि शनिवारी सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यात कुडेसावली येथील रमेश विठोबा गुरुनुले (४०) तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जिमलगट्टा येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रसपल्ली गावाजवळ रविवारी ४ वाजताच्या सुमारास विजय बापू कोठारी (३०) रा. मालागुड्डम, नीलेश तुळशिराम जरपला (१३) रा. रसपल्ली आणि अमरावती जिल्ह्यात प्रवीण गुलाबराव इंगळे (३५) व अर्चना प्रवीण इंगळे (३० दोन्ही रा.खेडपिंप्री) या पती-पत्नीचा मृत्यू झाला.
जखमींमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मसलीजवळचे दिलीप सोयाम, सावरगावजवळचे राजू जीवतोडे, संजय जीवतोडे, तळोधी नाईकचे कमलाकर सोनवणे आणि गडचिरोली जिल्ह्यात शंकर मलय्या गोमासे (३४) रा. रसपल्ली, मन्तेश पोचा दुर्गे (२८) रा. मालागुड्डम, मधुकर राजा दुर्गे (४५) रा. मालागुड्डम, भीमा पेंटा कुळमेथे (४०) रा. येदरंगा, नितीन महेंद्र जनगम (१०) रा. मालागुड्डम, राजू रामू बानेत (५०) रा. रसपल्ली, नरेंद्र बालाजी जनगम (२८) रा. मालागुड्डम, बंगो बंडे गावळे (५५) रा. येदरंगा, मोहन मधुकर अजमेर (३०) रा. रसपल्ली यांचा समावेश आहे.
गोंडपिपरी तालुक्यात धाबापासून काही अंतरावर वामनपल्ली शेतशिवारात लैलाबाई गेडाम काम करीत होती. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आल्याने ती शेताच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील आंब्याच्या झाडाखाली आली. दरम्यान, गौतम मानकर व पटवारी ए.डी. चौधरी हे तिथूनच दुचाकीने जात होते. पावसामुळे तेही त्याच रस्त्यावर दुसऱ्या झाडाखाली थांबले. मात्र गौतम मानकर हे लैलाबाई थांबून असलेल्या आंब्याच्या झाडाखाली गेले. तिथेच वीज कोसळली. यात गौतम मानकर व लैलाबाई गेडाम या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पटवारी चौधरी दुसऱ्या झाडाखाली असल्याने बचावले.
झोपडीतच पती-पत्नीचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेडपिंप्री येथे प्रवीण गुलाबराव इंगळे (३५) व अर्चना प्रवीण इंगळे (३०) पती-पत्नी शेतात फवारणीचे काम सुरु असल्याने शेतात गेले होते. परंतु दुपारी ४.३० वाजतापासून अचानक विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे दाम्पत्य शेतातीलच झोपडीत शिरले आणि याचवेळी झोपडीवर वीज कोसळल्याने दोघांचाही भाजल्याने मृत्यू झाला. वीज पडल्याने शेतातील झोपडीही बेचिराख झाली.

Web Title: 9 killed, 13 injured in electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.