सैन्य दलात नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक
By admin | Published: July 12, 2017 09:03 PM2017-07-12T21:03:48+5:302017-07-12T21:03:48+5:30
सैन्य दलात मुलांना नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून प्रशांत उर्फ परसराम पाटील (रा. बेळगाव, कर्नाटक) याने ११ महिलांकडून नऊ लाख ९५ हजारांची रोकड घेऊन फसवणूक केली.
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 12 - सैन्य दलात मुलांना नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून प्रशांत उर्फ परसराम पाटील (रा. बेळगाव, कर्नाटक) याने ११ महिलांकडून नऊ लाख ९५ हजारांची रोकड घेऊन फसवणूक केली.
याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळचा गणेशपुरा, इंदलगा बेळगाव येथील रहिवाशी असलेल्या जून २०१६ ते ११ जुलै २०१७ या कालावधीत कळव्याच्या खारीगाव येथील शोभा कदम या महिलेसह ११ महिलांकडून त्यांच्या मुलांना आर्मीमध्ये नोकरीला लावण्याच्या नावाखाली पैसे उकळले. यात काहींकडून ५० हजार, ७० हजार तर कोणाकडून ९० हजार रुपये काढून नोकरीस लावण्याचे अमिष दाखविले.
त्यांना भेटतांना तो नेहमी आर्मीच्या गणवेशातच असायचा. त्यामुळे या महिलांनाही त्याच्यावर विश्वास बसला. पैसे घेऊन त्याने त्यांना नोकरीचे बनावट कॉललेटरही पाठविले. प्रत्यक्षात या ११ तरुणांपैकी कोणालाही नोकरी लागली नाही. अखेर पाठपुरावा करुनही त्याने त्यांना पैसेही परत न केल्यामुळे त्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात ११ जुलै रोजी तक्रार दाखल केली. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले.