पंचवटीत ६ गावठी कट्टयासह ९ काडतुसे जप्त
By Admin | Published: September 13, 2016 01:44 PM2016-09-13T13:44:49+5:302016-09-13T13:44:49+5:30
मखमलाबादरोडवरील ड्रीम कॅस्टल चौकात फिरणाऱ्या तिघा संशयितांकडून पंचवटी पोलिसांनी सव्वालाख रूपये किंमतीचे ६ गावठी पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १३ - मखमलाबादरोडवरील ड्रीम कॅस्टल चौकात फिरणाऱ्या तिघा संशयितांकडून पंचवटी पोलिसांनी सव्वालाख रूपये किंमतीचे ६ गावठी पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.
याबाबत माहिती अशी की मखमलाबादरोड परिसरातील ड्रीम कॅस्टल चौकात सोमवारी रात्री शक्तीसिंह कालुसिंह राजपूत (२६), राहणार गणदीप सोसायटी, पाथर्डी फाटा, संतोष विलास अल्हाट (२३) स्टेट बँक जवळ सिडको, व सातपूरच्या संतोषी माता नगर येथिल सुनिल विष्णू नाथभजन (२५), हे तिघे संशयित गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली होती त्यानुसार सोमवारी रात्री नऊ वाजता परिसरात सापळा रचण्यात आला होता.
पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार ड्रीम कॅस्टल चौकातील सिग्नलजवळ तिघे संशयित फिरतांना दिसुन आले.पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ६ गावठी पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी संशयितांची कसुन चौकशी केली असता त्यांनी गावठी पिस्तुल व काडतुसे विक्री करण्यासाठी आणली होती अशी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उपनिरीक्षक महेश इंगोले, पोलिस हवलदार विजय गवांदे, मोतीराम चव्हाण, सचिन म्हस्दे, आप्पा गवळी, प्रविण कोकाटे, सतीश वसावे, भूषण रायते, सुरेश नरवाडे, महेश साळुंखे, संदीप शेळके, संतोष काकड, दशरथ निंबाळकर, प्रभाकर पवार आदिंनी ही कारवाई केली आहे.
पंचवटी परिसर पिस्तुल विक्री केंद्र?
पंचवटीतील मखमलाबादरोड परिसर गुन्हेगारी टोळीमुळे पहिल्या पासुन चर्चेत आहे. यापूर्वीही याच परिसरातून पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केले होते तर काही दिवसांपूर्वी याच परिसरात गुन्हेगारी टोळीने गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी याच परिसरातून तब्बल ६ पिस्तुल व ९ काडतुसे जप्त केल्याने व संशयित आरोपींनी सदरचे पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिल्याने पंचवटी परिसर गावठी पिस्तुल विक्रीचे केंद्र बनल्याचे बोलले जात आहे.