9 गोंधळी आमदारांचं निलंबन रद्द

By admin | Published: April 1, 2017 02:25 PM2017-04-01T14:25:57+5:302017-04-01T14:34:47+5:30

विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना प्रचंड गोंधळ घालणा-या 19 पैकी 9 आमदारांवरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे.

9 Suspension of Gondhli MLAs canceled | 9 गोंधळी आमदारांचं निलंबन रद्द

9 गोंधळी आमदारांचं निलंबन रद्द

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1- विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना प्रचंड गोंधळ घालणा-या 19 पैकी 9 आमदारांवरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. 

या आमदारांचं निलंबन रद्द
संग्राम थोपटे 
दीपक चव्हाण 
दत्तात्रय भरणे
अमित झनक
वैभव पिचड
डी.पी. सावंत
नरहरी झिरवाळ  
अब्दुल सत्तार
अवधूत तटकरे
 
काय आहे नेमके प्रकरण?
राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना गोंधळ घालून अडथळा निर्माण करणे, टाळ वाजविणे, भजन म्हणणे, बॅनर फडकविणे आणि घोषणाबाजी केल्याबद्दल तसेच नंतर अर्थसंकल्पाच्या प्रती विधान भवन परिसरात जाळल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना ३१ डिसेंबर २०१७पर्यंत निलंबित करण्यात आले. निलंबनाची ही कृती सरकार अल्पमतात येऊ नये म्हणून करण्यात आली आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता.  यावर विखे पाटील म्हणाले होते की लोकशाहीची हत्या आहे. कर्जमाफीची मागणी केली म्हणून निलंबन केले जात असेल तर ते घटनाबाह्य आणि अन्याय्य आहे. अर्थसंकल्प शेतकरी हिताचा नाही म्हणून ते निषेध करीत होते. 

आमदारांच्या निलंबनाचा इतिहास
विधिमंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंत आमदारांच्या निलंबनाची ४४ प्रकरणे झाली असून सर्वात पहिलं निलंबन १९६४ साली जांबुवंतराव धोटे यांचे करण्यात आले होते. विधानसभेत अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट फेकल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. तर आतापर्यंतचे सर्वात मोठे निलंबन १९६७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या ४३ आमदारांचे करण्यात आलं होतं. सीमा प्रश्नावर गोंधळ घातल्याप्रकरणी हे निलंबन करण्यात आलं होतं.

Web Title: 9 Suspension of Gondhli MLAs canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.