शीनाच्या हत्येला ९०० कोटींची आर्थिक बाजू?

By admin | Published: November 27, 2015 03:06 AM2015-11-27T03:06:23+5:302015-11-27T03:06:23+5:30

शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला मोठ्या आर्थिक व्यवहाराचीही बाजू असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर खात्याने पीटर मुखर्जीची कोठडी न्यायालयाकडून ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवून घेतली.

900 crore financially for murder of Sane? | शीनाच्या हत्येला ९०० कोटींची आर्थिक बाजू?

शीनाच्या हत्येला ९०० कोटींची आर्थिक बाजू?

Next

मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला मोठ्या आर्थिक व्यवहाराचीही बाजू असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) पीटर मुखर्जीची कोठडी न्यायालयाकडून ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवून घेतली.
या हत्याकांडात सीबीआयने प्रथमच आयएनएक्स मीडियाच्या आर्थिक व्यवहारांचा संबंध जोडला. आएनएक्स मीडिया आणि इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी यांच्यामध्ये ९०० कोटी रुपयांचा व्यवहार झालेला आहे. सिंगापूरमधील डीबीएस बँकेत वरिष्ठ पदावर असलेल्या आपल्या मैैत्रिणीच्या मदतीने इंद्राणीने शीनाच्या नावाने हाँगकाँग शांघाय बँकिंग कार्पोरेशनमध्ये (एचएसबीसी) किंवा सिंगापूरमधील अन्य दुसऱ्या बँकेत खाते उघडले असण्याची शक्यता, पीटर मुखर्जीने त्याच्या आम्ही केलेल्या चौकशीत बोलून दाखविली होती, हे कारण देऊन सीबीआयने
त्याच्या कोठडीची मुदत वाढवून मागितली.
सीबीआयच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ‘मुखर्जी जोडप्याने नऊ कंपन्या स्थापन केल्या व त्यांच्या माध्यमातून आयएनएक्स मीडियामध्ये पैसा येत होता. हा पैसा वळवण्यात येऊन, तो शीनाच्या खात्यात जमा होत असावा, असा आमचा संशय आहे. आम्ही इंटरपोलला या खात्यांचा तपशील मिळविण्यास या आधीच पत्र लिहिले आहे,’ असे सीबीआयने न्यायालयाला सांगताना, ‘पीटरची आम्ही न्यायवैद्यक मानसशास्त्रीय चाचणी घेतली असून, तिचा अहवाल मिळायचा आहे,’ असे म्हटले. न्यायालयाने पीटर मुखर्जीच्या कोठडीत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ केली.
पीटर आणि इंद्राणीने २००६-०७ दरम्यान अनेक कंपन्या स्थापन व प्रवर्तीत केल्या. त्यात ९०० कोटी गुंतविले. चौकशीत पीटरने इंद्राणीने एचएसबीसीमध्ये, सिंगापूर किंवा हाँगकाँगमधील एखाद्या बँकेत शीनाचे खाते उघडले असावे, असे सांगितले, असे सीबीआयने सांगितले.
अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंह यांनी सीबीआयची बाजू मांडली. ते म्हणाले, ‘सिंगापूरच्या डीबीएसमध्ये वरिष्ठ पदावर असलेली इंद्राणीची मैत्रीण गायत्री आहुजाने तिला खाते उघडण्यास मदत केली असावी. आम्ही इंटरपोलला या खात्यांचा तपशील मिळविण्यासाठी लिहिले आहे. आयकर रिटर्नस्ही मिळविले आहेत.’
इंद्राणी आणि पीटर मुखर्जी चालवत असलेल्या ‘नाइन एक्स मीडिया प्रायव्हेट लि.’ने आपले अंतर्गत लेखापरीक्षण केले आहे. या कंपनीत ३१ मार्च २००९ पर्यंत नऊ कंपन्यांचे शेअर्स असल्याचे आढळले आहे. या दोघांनी मोठ्या प्रमाणात पैशांचे चुकीचे वाटप केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांनी पैसा इतरत्र वळविणे आणि बेनामी खात्यांमध्ये तो ठेवण्यासाठी जे मार्ग वापरले, ते माहिती करून घेण्यासाठी पीटरच्या कोठडीची गरज आहे. आयकर रिटर्नस्ची खातरजमा पीटरकडून करून घ्यायची आहे. त्याच्या परस्परविरोधी विधानांची खातरजमा करण्यासाठी लाय डिटेक्टर चाचणीही करून घ्यायची आहे, असे त्याच्या कोठडीची मुदत वाढवून मागणाऱ्या अर्जात सीबीआयने म्हटले.
‘हा मोठ्या कटाचा भाग असल्यामुळे सात दिवसांच्या कोठडीची गरज आहे,’ असे सिंह म्हणाले. पीटर मुखर्जींच्या वकिलांपैकी अ‍ॅड. मिहीर घीवाला यांनी युक्तिवाद केला की, ‘सगळ््या व्यवहारांची नोंद दस्तावेजावर असल्यामुळे कोठडीची गरज नाही. राहुल आणि शीनाच्या प्रेम संबंधांना पीटरचा विरोध नव्हता, असे विधीने तिच्या निवेदनात म्हटले होते. शीनाचे एचएसबीसीमध्ये खाते होते, असे मान्यही केले, तरी पीटरच्या कोठडीमुळे त्यात अशी कोणती मदत होणार आहे,’ असा प्रश्न मिहीर घीवाला यांनी उपस्थित केला.
> न्यायालयात आणले, तेव्हा तो अगदी सहज आणि हसत-हसत वावरत होता. युक्तिवादापूर्वी त्याच्या वकिलाने त्याची थोडा वेळ भेटही घेतली. पीटरची या आधीची पत्नी शबनम सिंह यावेळी न्यायालयात हजर होती. नाइन एक्स व्यवहाराची जेव्हा चर्चा होत होती, त्यावेळी पीटर राहुल, त्याचा भाऊ गौतम आणि त्याचा मुलगा रॉबिन याच्या अंगावर हात ठेवत होता.
> मुखर्जींचे टष्ट्वीटर अकाऊंट
पीटरच्या कुटुंबीयांनी गुरुवारी टष्ट्वीटर अकाउंट सुरू केले. त्याची टॅगलाइन आहे, आॅफिशियल मुखर्जी फॅमिली अकाऊंट. पीटर कुटुंबात खूप लाडका असून, तो अनेकांचा जवळचा मित्र आहे. तो सगळ्या आरोपांत निर्दोष आहे, असा संदेश या अकाउंटवरून देण्यात आला आहे.

Web Title: 900 crore financially for murder of Sane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.