राज्यातील ९२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड; ७१ मुले, २१ मुलींचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:31 AM2018-11-20T01:31:19+5:302018-11-20T01:31:31+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत १२ नोव्हेंबर, २०१६ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेंतर्गत (राज्यस्तर) शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत १२ नोव्हेंबर, २०१६ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेंतर्गत (राज्यस्तर) शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातील ९२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ७१ मुले आणि २१ मुलींचा समावेश आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी महाराष्ट्रातून ३८९ मुले बसली होती. १३ मे, २०१८ रोजी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आली. ९२ विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र शासन अभ्यासक्रमाच्या ३९ विद्यार्थ्यांना, सीबीएसईच्या ३९, आयसीईएस अभ्यासक्रमाच्या १०, तर इतर अभ्यासक्रमाच्या ४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्तीच्या एकूण १००० जागा असून, त्यापैकी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ९२ जागा पटकावल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी जाहीर केले.
महाराष्ट्रातून या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या ९२ विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचे १४, नांदेडचे १३, पुण्याचे १० आणि ठाण्याचे ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
पात्र ठरलेले विद्यार्थी
दक्षिण मुंबई १४
ठाणे ०९
पुणे १०
अहमदनगर १
सोलापूर १
नाशिक १
रायगड १
जळगाव ४
कोल्हापूर १
सातारा ४
सिंधुदुग १
औरंगाबाद ११
जालना २
बीड १
परभणी १
अमरावती ४
बुलडाणा १
अकोला १
नागपूर ९
वर्धा १
लातूर १
नांदेड १३