जिल्हा बँकेला ९३ कोटींची मदत
By admin | Published: June 5, 2014 01:00 AM2014-06-05T01:00:54+5:302014-06-05T01:00:54+5:30
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने नागपूर जिल्हा बँकेला ९३ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल,
भागभांडवल : रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळणार
मोरेश्वर मानापुरे - नागपूर
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने नागपूर जिल्हा बँकेला ९३ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल, शिवाय सीआरएआर ४ टक्क्यांवर गेल्याने बँकेला रिझर्व्ह बँकेचा आर्थिक परवाना मिळण्यास काहीच अडचणी येणार नाही.
शासनाने घोषित केलेल्या ३१९ कोटींपैकी वर्धा बँकेला १0२ कोटी आणि बुलडाणा बँकेला १२४ कोटींची मदत भागभांडवल स्वरुपात राहील. याआधी शासनाने अशा प्रकारची मदत धुळे नंदूरबार बँकेला केली होती. याआधी नागपूर जिल्हा बँकेचे नेटवर्थ ७७.४१ कोटींनी निगेटिव्ह होते. शासनाच्या ९३ कोटींच्या मदतीने हे नेटवर्थ १५.५९ कोटींनी पॉझिटिव्ह होईल. याशिवाय ९.९८ टक्के असलेला सीआरएआर नेटवर्थ पॉझिटिव्ह झाल्याने ३१.१८ कोटींवर जाईल. तो ४ टक्क्यांपेक्षा (३१.१८ कोटी) जास्त असेल. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सर्व अटींची पूर्तता होईल. शिवाय बँकेचे व्यवहार लवकरच नियमित होतील.