कोयनेतून ९५% वीजनिर्मिती बंद

By Admin | Published: July 2, 2014 04:27 AM2014-07-02T04:27:28+5:302014-07-02T04:27:28+5:30

कोयना धरणात फक्त ८.६१ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने वीजनिर्मितीसाठी पाणी देणे बंद केले आहे.

95% of the electricity from the Koyna closed | कोयनेतून ९५% वीजनिर्मिती बंद

कोयनेतून ९५% वीजनिर्मिती बंद

googlenewsNext

पाटण : कोयना धरणात फक्त ८.६१ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने वीजनिर्मितीसाठी पाणी देणे बंद केले आहे. परिणामी १९६0 पैकी १८५0 मेगावॅट वीज निर्मिती बंद झाली आहे. पावसाचे आगमन आणखी लांबणीवर पडले, तर सुरू असणारी ११0 मेगावॅट वीज निर्मिती कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे.
एकूण १0५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातून १९६0 मेगावॅट वीज निर्मिती होते. धरणात आजमितीस केवळ ८.६१ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. धरण व्यवस्थापनाने चौथ्या टप्प्यासाठी पाणी देणे बंद केल्यामुळे एक हजार मेगावॅट निर्मिती बंद झाली आहे. कोयना धरण टप्पा क्रमांक एक आणि दोनमधून ६00 मेगावॅट वीज निर्मिती होते. मात्र, यापैकी टप्पा क्रमांक एक सुरू असून, येथे फक्त ७0 मेगावॅट निर्मिती सुरू आहे.
दुसरा टप्पा बंदच आहे. टप्पा क्रमांक तीन कोळकेवाडी येथून ३२0 मेगावॅट वीज निर्मिती होते. मात्र, तोही बंद आहे. टप्पा क्रमांक चार तांबटवाडी येथून एक हजार मेगावॅट निर्मिती होते, मात्र तोही बंद आहे.
पायथा वीजगृहातून ८0 मेगावॅट निर्मिती होते. येथे चार संच आहेत. यापैकी दोन संच बंद असून, येथून फक्त ४0 मेगावॅटच वीजनिर्मिती होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 95% of the electricity from the Koyna closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.