काँग्रेसने घेतल्या 35 जागांसाठी 95 इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Published: January 17, 2017 07:17 PM2017-01-17T19:17:49+5:302017-01-17T19:17:49+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी काँग्रेस भवन येथे मुलाखती घेतल्या.

95 interested interviews for 35 seats taken by Congress | काँग्रेसने घेतल्या 35 जागांसाठी 95 इच्छुकांच्या मुलाखती

काँग्रेसने घेतल्या 35 जागांसाठी 95 इच्छुकांच्या मुलाखती

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 17 -  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मंगळवारी काँग्रेस भवन येथे मुलाखती घेतल्या. अहमदपूर, उदगीर, निलंगा विधानसभा मतदारसंघातील ३५ गटांसाठी एकूण ९५ इच्छुकांनी मंगळवारी मुलाखती दिल्या. दरम्यान, बुधवारी लातूर ग्रामीण व औसा  विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. 
जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे पक्ष निरीक्षक माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रा.टी.पी. मुंडे, आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ. त्रिंबक भिसे, अशोकराव पाटील निलंगेकर, माजी आ. वैजनाथ शिंदे व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. पहिल्यांदा अहमदपूर-चाकूर व उदगीर, निलंगा विधानसभा मतदारसंघातील जि.प.च्या ३५ गटांसाठी मुलाखती झाल्या. यावेळी एकूण ९५ जणांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर पंचायत समितीच्या गणासाठी मुलाखती घेण्यात आल्या. अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातीलच ७३ गणांसाठी १७० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. 
यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस.आर. देशमुख, जि.प.चे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, गणेश कदम, विजयकुमार पाटील, मन्मथअप्पा किडे, कल्याण पाटील, मल्लिकार्जुन मानकरी, प्रभाकर बंडगर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलाखत देणाºया उमेदवारांनी काँग्रेस भवनसमोर शक्तीप्रदर्शनही केल्याचे दिसून आले. दिवसभर काँग्रेस भवन परिसरात इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी होती.

Web Title: 95 interested interviews for 35 seats taken by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.