मथुरा येथे अडकून पडलेले 95 वारकरी महाराष्ट्रात सुखरूप परतले; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 10:00 PM2020-03-30T22:00:36+5:302020-03-30T22:01:05+5:30

परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन  हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार  नियोजन करण्यात आले. 

The 95 Warkaris trapped in Mathura returned to Maharashtra safely; Dr. nilam gorhe efforts vrd | मथुरा येथे अडकून पडलेले 95 वारकरी महाराष्ट्रात सुखरूप परतले; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या प्रयत्नांना यश

मथुरा येथे अडकून पडलेले 95 वारकरी महाराष्ट्रात सुखरूप परतले; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या प्रयत्नांना यश

Next

मुंबई : कोरोनामुळे देशातील तसेच राज्यातील नागरिक विविध ठिकाणी अडकून बसले आहेत. असेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे नागरिक मथुरा येथे अडकल्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना २७ मार्च, २०२० रोजी दूरध्वनीद्वारे हभप वास्कर महाराज व उखळीकर महाराज पंढरपूर यांनी कल्पना दिली. यांसदर्भात उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी तात्काळ उपसभापती कार्यालयीन खाजगी सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी यांना अडकलेल्या वारकऱ्यांना सोडविण्याबाबत उपयोजन करण्यास आदेश दिले. त्यानुसार या अधिकारी यांनी २७ पासून उत्तर प्रदेश गृहविभाग, जिल्हाधिकारी मथुरा, तसेच मध्य प्रदेश गृहविभाग यांच्याशी संपर्क साधला. परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने स्वच्छता व आरोग्यविषयक दक्षता घेऊन  हाताळणे आवश्यक होते. त्यानुसार  नियोजन करण्यात आले. 

या वारकऱ्यांना प्रवास करण्यासाठी कोणाकडे संपर्क साधायचा याबाबत काहीच ज्ञान नव्हते, वृदांवन मथुरा येथून निघण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, रस्त्यात रहाण्याची व्यवस्था नव्हती तसेच  विविध राज्याच्या प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य नसल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते. परंतु डॉ. नीलम गोऱ्हे  उपसभापती यांनी त्यांना धीर दिला आणि प्रशासनांशी संवाद साधून त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व सातत्याने तसे काम केले. उपसभापती कार्यालयाच्या पाठपुराव्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना मदत मिळण्यास सुरवात झाली आणि त्यांना मायेची साथ मिळाल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले. या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवाससाठी दोन ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली तर यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काल  २९ मार्च, २०२० रोजी त्यांचे वृन्दावन येथे  हेल्थ चेकअप करून त्यांना उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात आणण्याबाबतच्या प्रवासाची परवानगी मिळाली.

यात उपसभापती कार्यालयातील अधिकारी सचिन चिखलीकर हे वारकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांना मायनगरीत आणण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. आज  ३० मार्च, २०२० रोजी पहाटे त्यांचे परळी वैजनाथ येथे आगमन झाले असून त्यांचे तेथे पुन्हा मेडिकल चेकअप केले जात असून त्यांना मेडिकल अधिकारी यांच्या निगरानी ठेवण्यात आले असून लवकरच त्यांचे पंढरपूर येथे आगमन होईल. या संपूर्ण संवेदनशील वातावरणात डॉ. नीलम गोऱ्हेंनी वारकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना महाराष्ट्र मध्ये आणण्यात केलेल्या प्रयत्नाबद्दल वारकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

Web Title: The 95 Warkaris trapped in Mathura returned to Maharashtra safely; Dr. nilam gorhe efforts vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.