बेस्टचे 97 टक्के कर्मचारी संपाच्या विचारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 06:44 PM2017-07-19T18:44:40+5:302017-07-19T18:44:40+5:30
अनेक प्रलंबित मागण्यांमुळे वैतागलेले बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याच्या विचारात आहेत. आज बेस्टमधील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - अनेक प्रलंबित मागण्यांमुळे वैतागलेले बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याच्या विचारात आहेत. आज बेस्टमधील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आयोजित केलेल्या मतदानात तब्बल 97 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र संपाबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्टची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात खालावली आहे.
संपाचे हत्यार उपसण्याआधी बेस्टच्या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समितीने कामगारांचा कल जाणून घेतला. त्यासाठी मतदानाचा अवलंब करण्यात आला. या मतगानामध्ये बेस्टच्या विविध विभागातील 19 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात काही अपवाद वगळता बहुतांश मतदारांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे.
अधिक वाचा
दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत होत नसल्याने संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र नंतर हा संप मागे घेण्याता आला होता. बेस्ट प्रशासनाने मे महिन्याचा अर्धा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अडचणीत असलेल्या बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशानाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.