972 घरांसाठी म्हाडाची सोडत
By admin | Published: June 22, 2016 08:45 AM2016-06-22T08:45:32+5:302016-06-22T09:53:20+5:30
म्हाडा प्राधिकरणाने सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या 972 घरांची सोडत काढली असून 23 जून ते 23 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 22 - गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढल्यानंतर, म्हाडा प्राधिकरणाने आता सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत काढली आहे. 972 घरांसाठी ही सोडत काढण्यात आली असून म्हाडाने यासंबंधीची जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. 23 जून ते 23 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण जर ऑनलाइन अर्ज करत असाल तर 24 जून ते 25 जुलैपर्यंत मुदत आहे. 24 जून ते 27 जुलै दरम्यान बँकेत डीडी भरु शकता. 10 ऑगस्टला घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
प्रत्यक्षात ३१ मे रोजी सर्वसामान्यांसाठीच्या परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यात येणार होती. मात्र, गिरणी कामगारांच्या सोडतीच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीला विलंब झाला, असे स्पष्टीकरण प्राधिकरणाने दिले होते. यावर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ‘घरांच्या सोडतीसाठीच्या ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’चे काम सुरू होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांच्या सोडतीसाठी विलंब झाला. मात्र, आता हे काम अंतिम टप्प्यात आहे', अशी माहिती दिली होती.
घरं कुठे?
सायन, प्रतीक्षानगर, मानखुर्द, मुलुंड, पवई, बोरिवली, शिंपोली, गोरेगाव, वर्सोवा, दहिसर, चांदिवली येथे ही घरे असून यात उच्च उत्पन्न गटांच्याही घरांचा समावेश आहे.