४ वर्षात गोव्यात ९८ मराठी शाळा बंद
By admin | Published: July 25, 2016 08:20 PM2016-07-25T20:20:20+5:302016-07-25T20:20:20+5:30
२०१२ - ते २०१६ या चार वर्षाच्या काळात राज्यात मराठी व कोंकणी माध्यमातून मिळून ९८ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्नाला लेखी
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २५ : २०१२ - ते २०१६ या चार वर्षाच्या काळात राज्यात मराठी व कोंकणी माध्यमातून मिळून ९८ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत अतारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.
मागील चार वर्षात राज्यात किती प्राथमिक शाळा सुरू झाल्या आणि कोणत्या माध्यमातून सुरू झाल्या तसेच किती बंद ्र करण्यात आल्या असा असा प्रश्न साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना एकूण ९८ प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. २०१२ -१३ साली ७ शाळा, २०१३ -१४ साली ३९ शाळा, २०१४-१५ साली ३५ शाळा आणि २०१५-१६ साली १७ शाळा बंद करण्यात आल्या.
बंद करण्यात आलेल्या शाळा या मराठी व कोंकणी माद्यमातील आहेत. तसेच मागील चार वर्षांत एकूण ८५नवीन सुरू करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ८५शाळांपैकी बहुतेक शाळा या मराठी व कोंकणी माध्यमातून आहेत. केवळ तीन शाळा ऊर्दू माध्यमातून तर एक शाळा हिंदी माध्यमातून आहे.