हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर, तरुणाईत उत्साह वाढविण्यासाठी उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 09:58 AM2022-11-18T09:58:03+5:302022-11-18T09:58:19+5:30
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेली भारत जोडो यात्रेत हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरला आहे.
हनुमान जगताप
शेगाव :
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेली भारत जोडो यात्रेत हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरला आहे. तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी व देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी तो सहभागी झाला आहे.
दिव्यांग म्हटलं की,त्याच जिवन अंधकारमय आहे अशी बहुतेकांची मानसिकता आहे.मात्र त्यावर ही मात करून समाजात ताठ मानेने स्वाभीमानाने जगता येवू शकते हि बाब भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून बाळापूर -शेगांव रस्त्यावर अधोरेखीत झाली आहे.दिवसेदिंवस त्याचा वाढत असलेला उत्साह खूप काही शिकवून जातो.
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील सूरज शर्मा हा २३ वर्षीय तरुण खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत तेलंगणा राज्यातून सहभागी झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून तो अविरत यात्रेच्या निमित्ताने पायी चालत आहे.
सूरज शर्मा, दोन्ही हात अर्धवट घेवून जन्माला आलेला आहे.त्याच आखूड हातांनी देशभरातील संस्कृतीने नटलेल्या परंपरांच व प्रदर्शनांच चित्रण तो आपल्या आखूड हातांनी करून त्या त्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून अभ्यास करीत आहे.एवढच नाही तर शक्य तेवढ्या इव्हेंट मध्ये सहभागी होत आहे. हे विशेष..!
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने खा.राहुल गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेला सूरज ,हा महाराष्ट्राच्या अंतिम टप्प्यात सहभागी होवून पुढे काश्मीर पर्यंत सहभाग नोंदविणार आहे. परमेश्वराने जन्म दिला त्याच चिज करायचयं ,दिव्यांग म्हणून घरात बसून राहण्यात अर्थ नाही अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.