ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 05:10 PM2024-06-26T17:10:30+5:302024-06-26T17:10:54+5:30

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

A big company in the EV sector will come to Maharashtra, Ather Energy in Aurangabad midc; 4000 people will get employment; devendra Fadnavis' announcement | ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ईव्ही दुचाकी निर्माण करणारी एथर ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असून याद्वारे सुमारे ४००० रोजगार निर्माण होतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

एथर एनर्जी कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन एमआयडीसीमध्ये १०० एकरावर आपला प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डीएमआयसीमध्ये उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. अधिकाऱ्यांनी जागेचीही पाहणी केली होती. एवढेच नव्हे तर येथील सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली होती.  सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमएआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. एथरचा हा तिसरा उत्पादन प्रकल्प आहे. या कंपनीला हिरो मोटो कॉर्पचे आर्थि पाठबळ आहे. 

एथरचा अत्याधुनिक प्लांट दरवर्षी 1 दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक दोन्ही तयार करणार आहे. समृद्धी द्रुतगती मार्गाद्वारे प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे, गुंतवणूकदार या मराठवाड्याची क्षमता वाढवत आहेत. एथरने मराठवाड्याची केलेली निवड महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

सीएमआयएचा विशेष पाठपुरावा
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा असलेली लॅण्ड बँक ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये उपलब्ध आहे. यामुळे येथे मोठा अँकर प्रकल्प यावा यासाठी सीएमआयएचे पदाधिकारी दोन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत होते. सीएमआयएने एमजीएममध्ये आयोजित कॉन्फ्रन्ससाठी अथरचे सहसंस्थापक स्वप्निल जैन यांना आमंत्रित केले होते. एवढेच नव्हे तर येथील व्हेंडर साखळी अथरसाठी किती पूरक आहे, हे पटवूनही दिले होते. सीएमआयएने केेलेल्या प्रयत्नांना आता फळ आल्याची चर्चा आता उद्योगजगतात आहे.
 

Web Title: A big company in the EV sector will come to Maharashtra, Ather Energy in Aurangabad midc; 4000 people will get employment; devendra Fadnavis' announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.