शिंदे गटाला झटका! सदा सरवणकर यांची दसरा मेळाव्यावरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:07 PM2022-09-23T16:07:55+5:302022-09-23T16:08:18+5:30

च्च न्यायालयाने पालिकेला तुम्हाला यापूर्वी असे अर्ज आले होते का? त्यावर त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेतलात असा सवाल न्यायालयाने केला. 

A blow to the Eknaths Shinde group! Sada Saravankar's petition on Dussehra Melava on Thackeray group rejected by High Court | शिंदे गटाला झटका! सदा सरवणकर यांची दसरा मेळाव्यावरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

शिंदे गटाला झटका! सदा सरवणकर यांची दसरा मेळाव्यावरील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

googlenewsNext

दसरा मेळाव्यावरील मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्य़े ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने तुमचा युक्तीवाद मर्यादेत ठेवा, निर्णयही द्यायचा आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले. 

यावेळी उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाने पालिकेला तुम्हाला यापूर्वी असे अर्ज आले होते का? त्यावर त्यावेळी तुम्ही काय निर्णय घेतलात असा सवाल न्यायालयाने केला. 

ठाकरे गटाला शिवतिर्थावर मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सद सरवणकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत आम्हीच खरी शिवसेना आहोत, यामुळे शिवाजी पार्कची जागा आम्हाला मिळायला हवी अशी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने शिवसेना नेमकी कोणाची हा विषयच नसल्याचे म्हणत ही याचिका फेटाळाली आहे. यामुळे शिंदे गटाला शिवतिर्थावर दसरा मेळावा घेता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.  

 दरवर्षी शिवसेनेच्या वतीने सदा सरवणकर हे पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करत होते. त्यामुळे माझ्या अर्जालाच परवानगी दिली गेली पाहिजे, असं सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत विलंब केल्याने सेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

Web Title: A blow to the Eknaths Shinde group! Sada Saravankar's petition on Dussehra Melava on Thackeray group rejected by High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.