'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:21 PM2022-09-18T18:21:40+5:302022-09-18T18:22:21+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांची जीभ घसरली.

'A brilliant man like Devendra Fadnavis has to work under the hands of illiterate Elnath Shinde' | 'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय'

'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय'

googlenewsNext

मुंबई-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यासह सर्व 40 आमदारांवर शिवसेना नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे. यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरले. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात राऊत बोलत होते. त्यांच्या या टीकेमुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेवर जहरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांच्या तोंडून शिवी निघाली. 'उद्धव ठाकरेंनाना एकटं पाडायचं आणि शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भ*** 40 गद्दारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, असे बिंबवण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा हा डाव उधळून टाकायचा आहे. शिवसेना फक्त बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची आहे, हे दाखवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असं राऊत म्हणाले. 

'फडणवीसांना आडाण्याच्या हाताखाली...'
विनायक राऊत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही खोचक टोला लगावला. राऊत म्हणाले, 'महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला पाठवण्याचं पाप या शिंदे सरकारने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू व्यक्तीवर दुर्दैवी वेळ आली आहे. त्यांना अशा आडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत आहे', असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: 'A brilliant man like Devendra Fadnavis has to work under the hands of illiterate Elnath Shinde'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.