शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:16 PM2022-02-01T18:16:45+5:302022-02-01T18:17:27+5:30

अर्थसंकल्पाचे गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. सध्या देशावर कोरोनाच्या आपत्तीचे संकट आहे. असे असताना शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत.

A budget that uplifts the common man, including farmers says MLA Girish Mahajan | शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प, आमदार गिरीश महाजनांकडून बजेटचे स्वागत

Next

जळगाव - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कोरोनाच्या आपत्तीतही शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा आहे. या अर्थसंकल्पात देशाचा चौफेर विकास साधण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पाचे गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. सध्या देशावर कोरोनाच्या आपत्तीचे संकट आहे. असे असताना शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे केंद्र सरकारने कडधान्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले असून याचे मूल्य शेतकऱ्यांना थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे.

रासायनिक खतांनी मुक्त असणाऱ्या शेतीला यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आता नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेती आदी विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. शेतीसोबत अर्थसंकल्पात रोजगारालाही प्राधान्य देण्यात आले असून वर्षभरात ६० लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तर लहान व मध्यम व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी देखील अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, असेही महाजन म्हणाले.

महाजन म्हणाले, आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे, त्याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: A budget that uplifts the common man, including farmers says MLA Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.