खासगी बस आणि कारची समाेरासमाेर धडक; तीन ठार, दाेन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 05:01 PM2022-04-23T17:01:11+5:302022-04-23T17:02:13+5:30

Accident News : इंदल चव्हाण (३८), योगेश विसपुते (२४), विशाल विसपुते (३४) अशी मृतकांची नावे आहेत.

A collision between a private bus and a car; Three killed, Daen Gambhir | खासगी बस आणि कारची समाेरासमाेर धडक; तीन ठार, दाेन गंभीर

खासगी बस आणि कारची समाेरासमाेर धडक; तीन ठार, दाेन गंभीर

Next
ठळक मुद्देखामखेड बसस्थानकाजवळील घटना मृतक चाळीसगाव येथील

मेहकर : खासगी बस आणि कारची समाेरासमाेर धडक झाल्याने तिघेजण जागीच ठार झाले तर दाेघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २३ एप्रिल राेजी सकाळी नागपूर - मुंबई महामार्गावर खामखेड बसस्थानकाजवळ घडली. इंदल चव्हाण (३८), योगेश विसपुते (२४), विशाल विसपुते (३४) अशी मृतकांची नावे आहेत.
चाळीसगाव येथील पाचजण कार क्रमांक (एमएच ०६, डब्ल्यू ५१३४)ने आर्णी येथे जात हाेते. दि. २३ एप्रिल राेजी पहाटे ३ वाजता नागपूर - मुंबई महामार्गावर खामखेड बसस्थानकाजवळ खासगी बस क्रमांक (एमएच ४०, बीएल ७०६१) व कारची समाेरासमाेर धडक झाली. यामध्ये इंदल चव्हाण, योगेश विसपुते, विशाल विसपुते हे जागीच ठार झाले तर चालक ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण व मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

Web Title: A collision between a private bus and a car; Three killed, Daen Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.