कावळा बसायला, फांदी तुटायला; भारती पवारांच्या दौऱ्यावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 11:00 AM2022-12-03T11:00:21+5:302022-12-03T11:00:51+5:30
शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे दिसल्याने भारती पवार यांनी डॉक्टरांना खडेबोल सुनावले होते. याकडे विरोधकांनी पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचीच एकप्रकारे पोलखोल केल्याची चर्चा सुरु केली होती.
अमरावती/मुंबई: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्या तेथील आरोग्य यंत्रणांचा आढावा घेत आहेत. असे असताना राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यावरून पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे दिसल्याने भारती पवार यांनी डॉक्टरांना खडेबोल सुनावले होते. याकडे विरोधकांनी पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचीच एकप्रकारे पोलखोल केल्याची चर्चा सुरु केली होती. यावर तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे.
भारती पवार जेव्हा जिल्ह्यात आल्या तेव्हाच नेमका औषधांचा साठा संपत आला असेल. कावळा बसावा आणि फांदी तुटावी अशी परिस्थिती तिथे झाली असावी. यामुळे भारती पवार तिथे बोलल्या असतील, असे तानाजी सावंत म्हणाले.
यानंतर भारती पवार यांनी कोल्हापूरमध्ये देखील डॉक्टरांना खडेबोल सुनावले. प्रत्येकाला शहरात थांबायचे असेल तर मग ग्रामीण भागात काम कोण करणार असा सवाल विचारत एकदा डॉक्टर झाला की सेवा करायचे विसरून जाता असे खडेबोल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुनावले. गरीबांची सेवा करायला म्हणून डॉक्टर होता. परंतू एकदा डॉक्टर झाले की सेवा विसरून जाता. ७० वर्षांपूर्वीचा जमाना गेला आता. जर पुरेसे डॉक्टर नसतील तर रोटेशन लावा. परंतू सर्वांना सेवा मिळाली पाहिजे. मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखायचे असतील तर असा निष्काळजीपणा कसा चालेल अशीही विचारणा त्यांनी केली.