शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 08:36 AM2024-11-25T08:36:13+5:302024-11-25T08:36:47+5:30

सरकारकडून हमी भावाने खरेदी सुरू, दर पाच हजारांवर  

A happy decision for farmers! As soon as the elections were over, the prices of soybeans in the state increased | शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले

शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले

मुंबई - राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा हा सोयाबीनचे घटलेले दर हाच होता. निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले. शेतकऱ्यांसाठी ही सुखद घटना असली तरी सोयाबीनच्या दराने सत्ताधारी पक्षाच्या नाकी दम आणला होता. 

राज्यात या वर्षी सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. एकूण खरीप क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. उत्पादनही विक्रमी येणार असाच अंदाज होता. सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४८९२ रुपये इतके किमान आधारभूत मूल्य जाहीर केले असले तरी सुरुवातीच्या काळात हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती. 

ऐन निवडणुकीत सोयाबीनचे भाव चार हजाराच्या आतच होते. यासाठी राज्य सरकारने राज्यात हमीभावाने खरेदी केंद्रे उघडली परंतु निवडणूक काळात ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाहीत. त्यामुळे दरावर चर्चा होण्याची गरज होती.

पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव 
विविध बाजारसमित्यांमध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. विशेषत: पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे.

निवडणुकीवर परिणाम
लोकसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी प्रचारात राळ उठविली होती. त्याचा फटका महायुतीला बसला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव ४८९२ इतका जाहीर करत हमीभाव केंद्रे सुरू केली. दर वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

Web Title: A happy decision for farmers! As soon as the elections were over, the prices of soybeans in the state increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.