Maharashtra Politics: “माझ्या मुलाला तुम्ही आमदार करा”; शेतकरी महिलेचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:05 PM2023-01-23T14:05:10+5:302023-01-23T14:05:46+5:30

Maharashtra News: एका शेतकरी महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुलाला आमदार करा, असे म्हटले आहे.

a letter from beed a farmer woman sagarbai vishnu gadale wrote to cm eknath shinde viral in social media | Maharashtra Politics: “माझ्या मुलाला तुम्ही आमदार करा”; शेतकरी महिलेचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र!

Maharashtra Politics: “माझ्या मुलाला तुम्ही आमदार करा”; शेतकरी महिलेचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र!

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली आहे. या घडामोडींमध्ये एका शेतकरी महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुलाला आमदार करण्याची विनंती केली आहे. 

एका शेतकरी महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्राची चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणचे माझ्या मुलाला तुम्ही आमदार केल्यानंतर तो फक्त एक रुपयाचे मानधन घेईल, असे पत्रात म्हटले आहे. सागरबाई गदळे असे शेतकरी महिलेचे नाव आहे. गदळे या केज तालुक्यातील दहिफळ गावातील रहिवासी आहेत. मी सागरबाई विष्णु गदळे आपणास विनंती करते की, माझा श्रीकांत गदळ गिल्या अनेक वर्षापासून राज्यातील शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. मात्र त्याच्याकडे कसलेही पद नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण आपण माझ्या श्रीकांतला आमदार करा, तो १ रुपया प्रतिमहीना काम करायला तयार आहे, असे सागरबाई गदळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे

माझ्या श्रीकांतला आमदार होऊन राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. एकलेच नाही तर, महाराष्ट्रातील गरीबी हटवण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून गरीबीमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. हे काम माझ्या -श्रीकांतला करायचे आहेत. त्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही माझ्या श्रीकांतला आमदार करा. राज्यातील शेतकरी व गोरगरीबांची सेवा करण्यांची संधी दया, जर आपण माझ्या श्रीकांतला ही संधी दिली. तर मी तुमची खुप आभारी राहील. नक्कीच माझा श्रीकांत आपण दिलेल्या आमदारकीचा योग्य वापर राज्यातील जे प्रश्न प्रलंबीत आहेत ते सोडवण्याचा पुर्णता करणार आहे, असे पुढे या पत्रात म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: a letter from beed a farmer woman sagarbai vishnu gadale wrote to cm eknath shinde viral in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.