देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव पुकारताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 01:38 PM2022-07-30T13:38:30+5:302022-07-30T13:39:22+5:30

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.

A mistake by CM Eknath Shinde, the name of PM Devendra Fadnavis was taken instead of PM Narendra Modi | देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव पुकारताच...

देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस, भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव पुकारताच...

googlenewsNext

नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याच्या दौऱ्यावर असून नाशिकमध्ये त्यांनी पोलीस वसाहतीचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. त्यानंतर उपस्थितही थक्क झाले. एकनाथ शिंदेंच्या तोंडी चुकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेच नाव आले. मात्र नंतर त्यांनी आपली चूक सुधारली तेव्हा लोकांमध्ये हशा पिकला. 

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने गेल्या महिनाभरापासून दोघा मंत्र्यांचेच कॅबिनेट चालवत असल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. पोलीस वसाहतीचे उद्घाटन माझ्या हस्ते होणार हा योग होता. पोलीस बांधव हे सण उत्सव, कोविड, ऊन वारा पाऊस असतानाही जनतेच रक्षण करतात. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस पार पाडत आहेत. मनुष्यबळ, यंत्रणा हे देण्याचे काम शासनाचे आहे. पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. जुन्या वसाहती आहेत, लिकेज आहेत, प्लॅस्टर्स पडत आहेत. राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.

तसेच जुन्या वसाहतींमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. पोलीस रस्त्यावर असताना घराची चिंता नसावी, तर ते अधिक कार्यक्षमताने काम करु शकतील, अतिशय उत्तम काम आता लोकार्पण केलेल्या इमारतीचे आहे. सर्व खात्यांना एकत्र आणून गृहनिर्माण सोसायटी तयार करणार. उपमुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोलणे झाले, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल कमी करा असे डीजीना सांगितले, त्यामुळे जनतेला त्रास नको असंही शिंदेंने सांगितले. 

दरम्यान, शिवसेना भाजपा युतीचे सरकार आले. अटलजी, अडवाणी, बाळासाहेब यांना अभिप्रेत असलेले सरकार आले आहे. मध्ये थोडी गडबड झाली होती. पंचनामे होत आहेत, शेतकऱ्यांसाठी दिलासा देतोय. पेट्रोल डिझेल दर कमी केले. समुद्राला जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवत आहोत, आमचा पर्सनल अजेंडा काही नाही असं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं.

मालेगावात शक्तीप्रदर्शन
मध्यरात्री दोन वाजता एकनाथ शिंदेंचं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आगमन झालं. यावेळी शिंदे गटातील आमदार आणि माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी डीजे बंद करायला लावत शिंदेंनी माईकचा वापर न करता उपस्थितांशी खणखणीत आवाजात संवाद साधला. 

मालेगावात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाच जिल्ह्यांची आढावा बैठक होणार आहे. बैठकीनंतर मालेगावच्या कॉलेज मैदानावर कार्यकर्ता मेळावा पार पडेल. यावेळी शिंदे गटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. ओपन रुफ कारमधून हात उंचावत शिंदेंनी समर्थकांचे आभार मानले. तर शिंदेंच्या पाठिराख्यांनी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मालेगावच्या नागरिकांना मुंबईला येण्याचं निमंत्रण एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. एकनाथ शिंदे दौऱ्यात नाशिक जिल्ह्याचं विभाजन करुन स्वतंत्र मालेगाव जिल्ह्याची घोषणा करणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 

Web Title: A mistake by CM Eknath Shinde, the name of PM Devendra Fadnavis was taken instead of PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.