कोल्हापूर चित्रनगरीत होणार वस्तुसंग्रहालय; जुने चित्रपट, पोस्टर्स, कॅमेरे पाहायला मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:29 IST2025-02-10T21:28:48+5:302025-02-10T21:29:28+5:30

साहित्य क्षेत्रासाठी 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान' पुरस्काराचीही आशिष शेलारांनी केली घोषणा

A museum will be built in Kolhapur's Chitranagari; Old films, posters, cameras will be on display! | कोल्हापूर चित्रनगरीत होणार वस्तुसंग्रहालय; जुने चित्रपट, पोस्टर्स, कॅमेरे पाहायला मिळणार!

कोल्हापूर चित्रनगरीत होणार वस्तुसंग्रहालय; जुने चित्रपट, पोस्टर्स, कॅमेरे पाहायला मिळणार!

Ashish Shelar Kolhapur : कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. याच सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशी विविध स्मृतिचिन्हे ठेवण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीसंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

"कोल्हापूर चित्रनगरी येथे नवीन वस्तुसंग्रहालयात मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जपला जाणार असून, जुन्या तसेच नव्या पिढीला चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली परंपरेची माहिती मिळेल. सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने लहान लहान चित्रफिती तयार करून त्यास समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येईल. कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे काम सुरळीत चालविले जावे यासाठी पाहिजे यंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामे सुरू असल्याने या विकासकामांकरिता चित्रपट नगरीची उत्तम जाण असलेल्या वास्तुविशारद यांची बाह्य स्रोतांद्वारे नियुक्ती करावी. ही पदे भरताना एमएसआयडीसीची मदत घ्यावी," असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले.

'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान' पुरस्कार

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना सन्मानित करण्यासाठी 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान' हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात येईल, अशी माहितीही शेलार यांनी दिली. हिंदी भाषा व साहित्य अकादमीच्या शिष्टमंडळांनी आज शेलार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा पुरस्कार देण्याबाबत सूचना केली. यानुसार दरवर्षी एका साहित्यिकाची निवड करून त्यास या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्यात येत असून लवकर याबाबतची घोषणा करण्यात येत असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Web Title: A museum will be built in Kolhapur's Chitranagari; Old films, posters, cameras will be on display!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.