भाजपा नेते विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवासमधील खोलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:44 IST2025-04-08T10:43:36+5:302025-04-08T10:44:21+5:30
Mumbai News: आमदार निवासमधील भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या खोलीमध्ये सोलापूरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

भाजपा नेते विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवासमधील खोलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
राज्य विधिमंडळातील आमदारांसाठीचं आमदार निवास हे त्या त्या आमदारांच्या मतदारसंघामधून मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांसह अनेकांसाठी हक्काचं आश्रयस्थान असतं. दरम्यान, या आमदार निवासमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. आमदार निवासमधील भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या खोलीमध्ये सोलापूरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
चंद्रकांत धोत्रे असं या व्यक्तीचं नाव असून, ते ६० वर्षांचे होते. चंद्रकांत धोत्रे हे काही कामनिमित्ताने मुंबईत दाखल झाले होते. सोमवारी रात्री ते आ. विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवासस्थानी ते मुक्कामी होते. रात्री उशिरा त्यांना हार्ट अटॅक आला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.