सशक्त अभिव्यक्तीचा रानकवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 02:29 PM2023-08-04T14:29:23+5:302023-08-04T14:29:51+5:30
...तेव्हा तिथे मला आग्रह करून त्यांनी कविता सादर करायला सांगितली. त्या काळात मी हिंदीत जास्त लिहीत असे. तिथे मी मराठी कविता सादर केली. त्याला रसिकांनी दाद दिली.
रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी -
आमच्या कविसंमेलनात भेटी व्हायच्या. मला लोक ‘सामना’मुळे चित्रपट निर्माता म्हणून ओळखायचे. मी कवी आहे, याची अनेकांना कल्पना नव्हती. एकदा मी बार्शीत कविसंमेलन ऐकायला गेलो होतो. त्या कविसंमेलनाचे महानोर हे अध्यक्ष होते. तेव्हा तिथे मला आग्रह करून त्यांनी कविता सादर करायला सांगितली. त्या काळात मी हिंदीत जास्त लिहीत असे. तिथे मी मराठी कविता सादर केली. त्याला रसिकांनी दाद दिली.
त्यांच्या कवितेची जातकुळी वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांनी मराठवाड्याच्या बोलीभाषेतले अनेक नवे शब्द मराठी साहित्याला दिले. ते महानगरात राहून कविता करणारे रानकवी नव्हते तर ते प्रत्यक्ष शेतात राहून शेती करत होते. म्हणूनच त्यांची कविता ही त्यांच्या जिवंत अनुभवातून आलेली होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कवी निसर्गावर लिहू लागले.