...अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 'त्याने' प्राण सोडले; ४० तासानंतरही अंत्यविधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:33 AM2022-12-06T05:33:31+5:302022-12-06T05:33:51+5:30

अप्पाराव पवार व इतर दहा ते बारा कुटुंबीय ३० ते ३५ वर्षांपासून वासनवाडी येथे गायरानात वास्तव्यास आहेत 

A protester who was on hunger strike for the construction of a house died in front of the Beed Collectorate | ...अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 'त्याने' प्राण सोडले; ४० तासानंतरही अंत्यविधी नाही

...अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 'त्याने' प्राण सोडले; ४० तासानंतरही अंत्यविधी नाही

googlenewsNext

बीड : गायरानातील अतिक्रमण कायम करावे व त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी मंजुरी द्यावी या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या अप्पाराव भुजंग पवार यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील आंदोलनस्थळी रविवारी पहाटे मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर ४० तासांनंतरही (सायं. ५ वाजेपर्यंत) अंत्यसंस्कार झालेले नव्हते. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येेथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. अप्पाराव पवार व इतर दहा ते बारा कुटुंबीय ३० ते ३५ वर्षांपासून वासनवाडी येथे गायरानात वास्तव्यास आहेत. त्यांनी तेथील अतिक्रमण कायम करावे, अशी मागणी केली होती. या मागणीसाठी ३ डिसेंबरपासून पवार दाम्पत्य व इतर नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ४ डिसेंबरला पहाटे अप्पाराव पवार यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: A protester who was on hunger strike for the construction of a house died in front of the Beed Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.