महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:25 AM2024-09-03T07:25:48+5:302024-09-03T07:26:15+5:30

President Draupadi Murmu: कोणत्याही समाजाच्या संतुलित विकासासाठी सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक असतो. महिला या समाजाच्या अविभाज्य अंग आहेत. महिलांची उपेक्षा करणारा समाज कधीच विकसित होऊ शकत नाही, असे ठोस प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे केले. 

A society that ignores women cannot develop, says President Draupadi Murmu | महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत

महिलांची उपेक्षा करणारा समाज विकसित होऊ शकत नाही, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मांडलं स्पष्ट मत

 कोल्हापूर - कोणत्याही समाजाच्या संतुलित विकासासाठी सर्व सदस्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक असतो. महिला या समाजाच्या अविभाज्य अंग आहेत. महिलांची उपेक्षा करणारा समाज कधीच विकसित होऊ शकत नाही, असे ठोस प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे केले. 

सोमवारी दुपारी वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा महिला उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वारणा विद्यापीठाचेही उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. 

महिलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवा
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, महिलांची क्षमता आणि शक्तीवर विश्वास ठेवून ५० वर्षांपूर्वी तात्यासाहेब कोरे यांनी महिला सहकार उद्योग समूहाची स्थापना केली. आज येथे प्रचंड संख्येने उपस्थित बहिणी आणि मुलींना पाहून त्यांचा विश्वास सार्थ ठरला आहे. या उद्योग समूहाने महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. आज सर्व क्षेत्रामध्ये महिला पुढे असून, मी अनेक विद्यापीठांमध्ये जाते. तेव्हा पाहते की मुलांपेक्षा मुलीच अधिक सुवर्णपदके मिळवत आहेत.

तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कारासाठी शिफारस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तात्यासाहेब कोरे हे द्रष्टे होते. महिलांची भागीदारी घेतल्याशिवाय संपूर्ण विकास शक्य नसल्याचे त्यांनी ५० वर्षांपूर्वी जाणले होते. त्यासाठी त्यांनी या संस्था उभ्या केल्या आणि महिलांना सक्षम केले. त्यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र शासन शिफारस करील. 

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आजसंसदपटू पुरस्कारांचे वितरण
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Web Title: A society that ignores women cannot develop, says President Draupadi Murmu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.