"गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात..."; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 21:49 IST2025-03-20T21:48:49+5:302025-03-20T21:49:48+5:30
संजय राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. चित्रा वाघ यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत आता सुषमा अंधारेंनी टीका केली आहे.

"गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात..."; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका
'तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय', असे विधान आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत बोलताना केले. त्यावर 'ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही', असे म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिशा सालियन प्रकरणावर बोलत असताना अनिल परबांनी संजय राठोड प्रकरणाचा उल्लेख केला. त्यावरून चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली. चित्रा वाघ यांनीही अनिल परब यांना उत्तर दिले.
"सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या ५६ जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात", अशी टीका सुषमा अंधारे चित्रा वाघ यांच्यावर केली.
सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत १बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळाकॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही.
— SushmaTai Andhare (@andharesushama) March 20, 2025
पण हे दरवेळी सांगायची गरज काय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!
आता चित्रा वाघ यांचा अनिल परबांना इशारा
"फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागत स्त्री काय आहे. फार हलक्यात घेतात महिलांना… काहीही आम्ही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि नादी लागलात आमच्या तर रोजचं ठेचणार", असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
"पण काही सटरफटर वटवाघूळ फडफडायचे सोडत नाही, असो स्वभाव एकेकाचा. कुणाच्या लेकराबाळांवर मला बोलतांना त्रास होतोय पण आमच्याबद्दल बोलतांना मात्र सगळचं ताळतंत्र सोडलेलं आहे म्हणून एकच प्रश्न जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची DNA चाचणी करा म्हणून मागणी करा म्हणतोय, काय बोलायचं या कार्यकर्तृत्वाच्या आलेखाला", अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती.