आधार फेल : ड्रेससाठी १२ लाख मुले अपात्र,५ लाख विद्यार्थ्यांना आधारच नाही, निधीला कात्री लागणार

By अविनाश साबापुरे | Published: April 1, 2024 09:42 AM2024-04-01T09:42:33+5:302024-04-01T09:43:53+5:30

Students In Maharashtra: राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

Aadhaar Fail: 12 lakh children ineligible for dress, 5 lakh students do not have Aadhaar, funds will be cut | आधार फेल : ड्रेससाठी १२ लाख मुले अपात्र,५ लाख विद्यार्थ्यांना आधारच नाही, निधीला कात्री लागणार

आधार फेल : ड्रेससाठी १२ लाख मुले अपात्र,५ लाख विद्यार्थ्यांना आधारच नाही, निधीला कात्री लागणार

- अविनाश साबापुरे
 यवतमाळ : राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार व्हॅलिडेशनसाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. १२ लाख ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड झाले आहे. गंभीर म्हणजे, ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही.

त्यामुळे नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून त्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राची किमान ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची वैधता ३० मार्चपर्यंत यूडायसवर पूर्ण करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. त्यात केवळ १२ जिल्ह्यांनी बाजी मारली. उर्वरित जिल्ह्यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पुरविल्यानंतर ज्यांचे व्हॅलिडेशन प्रलंबित आहे, अशा विद्यार्थ्यांची संख्याही ३२,०९५ आहे. त्यामुळे लवकरच जे जिल्हे ९५ टक्के कामगिरीच्या आसपास पोहोचले आहेत, ते हा टप्पा ओलांडणार आहेत. त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळते की नाही, हा प्रश्नच आहे. 

अभिनंदनाचे पत्र आले का? 
- आधार क्रमांकाचे ९५ टक्केपेक्षा अधिक काम मुदतीत पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने अभिनंदन पत्र पाठविले आहे. 
- यवतमाळ (९५.२५), सिंधुदुर्ग (९९.२४), कोल्हापूर (९७.८९), गडचिरोली (९७.४०), सांगली (९७.२९), भंडारा (९६.४७), गोंदिया (९६.३५), रत्नागिरी (९६.३१), अहमदनगर (९६.२५), चंद्रपूर (९५.६६), बुलढाणा (९५.२७) आणि सातारा (९५.२३) या १२ जिल्हा परिषदांचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी कौतुक केले.

तुमच्या जिल्ह्यात किती जणांचे आधारकार्ड ठरले इनव्हॅलिड?   
जिल्हा    आधार फेल
सिंधुदुर्ग    ६२२ 
कोल्हापूर     ७,९५९ 
गडचिरोली     ३,१४९ 
सांगली    ६,९५१ 
भंडारा    ६,७५८ 
गोंदिया    ६,९७० 
रत्नागिरी     ७,४५७ 
अ.नगर     २५,०६३ 
चंद्रपूर    १२,०९२ 
बुलढाणा     १६,४९३ 
यवतमाळ     १३,५४० 
सातारा    १६,४९९ 
परभणी    ११,३९७ 
हिंगोली    ७,०६० 
अमरावती    १५,०४७ 
वर्धा    १०,४८३ 
लातूर    १७,७९५ 
पुणे    ६५,९९५ 
वाशिम    ९,४६५ 
नाशिक    ५५,०१७ 
जळगाव    ३९,५८६ 
अकोला    १५,३३३ 
नागपूर    ४७,४९३ 
धाराशिव    १८,०६१ 
धुळे    २८,१२९ 
सोलापूर    ५८,८०३ 
नंदूरबार    २१,७७४ 
बीड     ३९,९८५ 
जालना    ३०,८४८ 
नांदेड    ५३,७५३ 
रायगड    ४०,९७१ 
मुंबई     १,०३,७५४ 
मुंबई उप.    ३८,०९१ 
छ. संभाजीनगर ९५,५३२ 
ठाणे    १,८५,२४० 
पालघर     १,०३,३१९
एकूण    १२,३६,४८४ 
 

Web Title: Aadhaar Fail: 12 lakh children ineligible for dress, 5 lakh students do not have Aadhaar, funds will be cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.