Corona Vaccination: हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 06:22 PM2021-04-28T18:22:39+5:302021-04-28T18:26:19+5:30

Corona Vaccination: मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी डिलीट करण्यात आलेल्या ट्विटसंदर्भात खुलासा केला आहे.

aaditya thackeray clarifies over deleted tweet about corona vaccination | Corona Vaccination: हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

Corona Vaccination: हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

Next
ठळक मुद्देआदित्य ठाकरेंनी केला खुलासामंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांचे नवे ट्विटविरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर साधला होता निशाणा

मुंबई: मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, यावरील नियंत्रणासाठी कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. १ मेपासून देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार असून, १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. देशातील अनेक राज्यांनी कोरोना लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनेही घेतला असून, यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेले एक ट्विट डिलीट केले होते. यानंतर विरोधकांनी टीकाही केली होती. यावर आता आदित्य ठाकरे यांनी खुलासा केला आहे. (aaditya thackeray clarifies over deleted tweet about corona vaccination)

राज्यातील कोरोना लसीकरण, लॉकडाऊन आणि अन्य मुद्द्यांवर राज्य मंत्रिमंडळाची नियमित बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी नवे ट्विट केले आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी डिलीट करण्यात आलेल्या ट्विटवर भाष्य केले होते. तीन दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणासंदर्भात केलेले ट्विट आदित्य ठाकरे यांनी डिलीट केले होते. यानंतर विरोधकांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला होता. 

“चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत”

हीच योग्य वेळ आहे

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी डिलीट करण्यात आलेल्या ट्विटसंदर्भात खुलासा केला आहे. तीन दिवसांपूर्वी माझे ट्विट डिलीट केले होते. कोणताही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, म्हणून मी ट्विट डिलीट केले होते. आता मंत्रिमंडळाने मोफत लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही बातमी शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नवीन ट्विटमध्ये म्हटले आहे.

RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक, मगच मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार; ECI चा नवा नियम

१८ ते ४४ वयोगटातील सर्वांचे मोफत लसीकरण

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी ४५ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण केले जात होते. राज्यात मोफत लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारला २ कोटी लसी विकत घ्याव्या लागतील. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून, त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

१३५ शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरे

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे. लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत जर लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत, असे टोपे यांनी सांगितले. 
 

Web Title: aaditya thackeray clarifies over deleted tweet about corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.