“आम्ही ‘सत्यमेव जयते’साठी लढतोय, भाजपाला फक्त सत्ता मिळवाची आहे”; आदित्य ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 04:21 PM2024-04-21T16:21:17+5:302024-04-21T16:21:26+5:30
Aaditya Thackeray News: संविधान वाचवायच असेल, देश वाचायचा असेल तर भाजपाला रोखावे लागेल, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Aaditya Thackeray News: आम्ही सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत आणि भाजप सत्तामेवसाठी लढत आहे . ही धोक्याची घंटा आहे. भाजपाचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे. देशात तरुण पिढी सगळ्यात जास्त आहे. खरी राष्ट्रवादी शरद पवारांकडे आहे. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंकडे आहे . देवेंद्र फडणवीस यांची कर्जमुक्ती कोणाला मिळाली का? शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही मदत केली . महायुतीच्या सरकारमधील एकही नेते शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही. सर्व नवीन उद्योग गुजरातला गेले, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
भाजपाला संविधान बदलायचा आहे. म्हणून त्यांना ४०० जागा पाहिजेत. भाजपा संविधानविरोधी आहे, आंबेडकरविरोधी आहे . भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान नको, त्यांना नवीन संविधान पाहिजे. संविधान वाचवायच असेल, देश वाचायचा असेल तर भाजपला रोखावे लागेल. देश हुकूमशाहीकडे चाललेला आहे, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
राज्यात तोडफोडीचे आणि चिखल फेकीचे राजकारण सुरू आहे
भाजपाला किती दिवस डोक्यावर बसवायचे, म्हणून आम्ही मविआ सरकार आणले, पण चाळीस गद्दार झाले, चिन्ह चोरले, नाव चोरले, पण उद्धव ठाकरेंवर जनतेचे प्रेम आणि विश्वास आहे. राज्यात तोडफोडीचे आणि चिखलफेकीचे राजकारण सुरू आहे . पण कमळाला चिखलच लागते, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . २०१४ आणि २०१९ मध्ये अच्छे दिन येणार असे सर्वांना वाटत होते . मात्र अच्छे दिन आले नाही. पण हुकूमशाही वाढत गेली, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.