Maharashtra Politics: “EDचा सर्रास गैरवापर, पण संजय राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 01:46 PM2022-11-10T13:46:11+5:302022-11-10T13:46:59+5:30

Maharashtra News: ईडीकडून निवडक लोकांना अटक करत असून, आपल्या मर्जीने कारवाई करत असल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली.

aam aadmi party leader anjali damania criticised ed action and shiv sena thackeray group sanjay raut | Maharashtra Politics: “EDचा सर्रास गैरवापर, पण संजय राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही”

Maharashtra Politics: “EDचा सर्रास गैरवापर, पण संजय राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही”

googlenewsNext

Maharashtra Politics: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला. अखेर १०० दिवसांनी संजय राऊत आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला. संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मनसेसह अन्य विरोधी पक्षांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. यानंतर आता आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या कारवाईवर टीका करतानाच संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. 

संजय राऊत आणि प्रवीण राऊतांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. प्रवीण राऊतांना फक्त दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली. संजय राऊतांना तर कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद राहिली आहे. ईडीनेही हे त्यांच्या तक्रारीत मान्य केले आहे. तरीदेखील म्हाडाच्या एकाही अधिकाऱ्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही. ठराविक लोकांनाच अटक करण्याची ईडीची वृत्तीच दिसून येते, या शब्दांत न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर ताशेरे ओढले. 

संजय राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही

यानंतर अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत संजय राऊत यांना मिळालेला जामीन आणि ईडीची कारवाई यावर भाष्य केले आहे. ED selective अटक करत आहे ह्यात काहीच शंका नाही.  मुख्य आरोपींना अटक न करता, ED ने  मर्जीच्या आरोपींना अटक केली ह्यातही शंका नाही. ED चा सर्रास गैरवापर होतोय.  पण राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 

दरम्यान, न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनंतर ईडीने आता संजय राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी करत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा पत्राचाळ घोटाळ्यात सहभाग होता की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: aam aadmi party leader anjali damania criticised ed action and shiv sena thackeray group sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.