वेगळ्या विदर्भासाठी आम आदमी पार्टीचा पाठिंबा
By Admin | Published: March 31, 2016 04:54 PM2016-03-31T16:54:44+5:302016-03-31T16:54:44+5:30
वेगळ्या विदर्भाला केजरीवाल यांनी पाठिंबा दिला असून आपचे खासदार वेगळ्या विदर्भासंदर्भात संसदेत आवाज उठवणार आहेत' अशी माहिती अणे यांनी बैठकीनंतर दिली आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - श्रीहरी अणे यांनी आज वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्ली सचिवालयात ही बैठक पार पडली. वेगळ्या विदर्भाला केजरीवाल यांनी पाठिंबा दिला असून आपचे खासदार वेगळ्या विदर्भासंदर्भात संसदेत आवाज उठवणार आहेत' अशी माहिती अणे यांनी बैठकीनंतर दिली आहे. 'केजरीवाल यांचा आंदोलनला पाठींबा असून विदर्भाचा आवाज वाढतोय तो बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय', असा आरोप अणे यांनी यावेळी केला
विदर्भाचा आवाज वाढतोय, तो बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपनं आमचा विश्वासघात केला. भाजपला बहुमत मिळालं परंतू आश्वासन पूर्ण केली नाहीत. असा आरोप श्रीहरी अणे यांनी भाजपावर केला आहे.
'कोणाकडेही एवढी शाई नाही जे विदर्भ आंदोलन संपवू शकेल', असा टोला राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नितेश राणे यांना लगावला आहे. 'नाटेकर यांनी वेगळ्या कोकणाची मागणी केली त्याकडे नितेश राणे यांनी लक्ष द्यावं', असंदेखील अणे यावेळी बोलले आहेत.
दरम्यान, श्रीहरी अणे यांनी विदर्भाबरोबर मराठवाडा स्वतंत्र करण्याचा विचार मांडला होता. वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्यावरुन श्रीहरी अणेंना महाधिवक्तापदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचे पडसाद अधिवेशनात उमटले होते. अखेर अणेंनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला होता.