आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा लढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 05:19 AM2024-10-27T05:19:02+5:302024-10-27T05:19:16+5:30

यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांआधी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीत आप व काँग्रेस हे घटक पक्ष आहेत.

Aam Aadmi Party will not contest Maharashtra Assembly | आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा लढणार नाही

आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा लढणार नाही

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (आप) महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे त्या पक्षाचे नेते व राज्यसभा खा. संजय सिंह यांनी शनिवारी जाहीर केले. ते म्हणाले की, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रचार करतील.  

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सेना, शरद पवार गट, काँग्रेस यांचा समावेश आहे. अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी यावे, याकरिता उद्धव ठाकरे सेना, शरद पवार गट यांनी त्यांना विनंती केली होती, असे आपच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांआधी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीत आप व काँग्रेस हे घटक पक्ष आहेत.

Web Title: Aam Aadmi Party will not contest Maharashtra Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.